Download App

मलिक, भाजपचा गेम प्लॅन अन् अजितदादा गटाला शंका; पवारांना घटस्फोट देण्याची भाजपची पूर्वतयारी ?

  • Written By: Last Updated:

मुंबईः देशातील पाच राज्यांच्या निवडणुका पार पडल्या. त्यातील हिंदीपट्ट्यातील छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थान ही तिन्ही राज्य भाजपने एकहाती आपल्या ताब्यात घेतली. राजस्थान आणि छत्तीसगडची सत्ता भाजपने काँग्रेसकडून हिसकावून घेतलीय. त्यामुळे आता भाजपचा (BJP) वेगळाच आत्मविश्वास आला आहे. या निकालाचे पडसाद राज्यात आणि देशातही उमटत आहे. भाजप आता नव्या आत्मविश्वासाने निवडणुकांना सामोरे जाणार आहे. त्यामुळे विरोधी पक्षांचे नेते आणि आघाड्यांबाबत सगळे पडसाद राज्यात उमटत आहे. तर भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी हे ट्रीपल इंजिन महायुती ही लोकसभेसाठी आहे हे अनेकांच्या मनात खात्री झाली आहे. अजित पवारांची (Ajit Pawar) साथ ही भाजपसाठी लोकसभा निवडणुकीपुरती आहे, असेही बोलले जात आहे. याची प्रचिती आता अजित पवार गटाच्या आमदारांना हिवाळी अधिवेशनात आली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) आमदारांच्या मनात एक धडकी भरली आहे. त्याची कारणे कोणतीही हे आता समोर येत आहेत.

नवाब मलिकांचे प्रकरण बुमरँग ठरणार?

हिवाळी अधिवेशनात तुरुंगातून बाहेर आलेले नवाब मलिक हे थेट सत्ताधारी बाकावर बसले होते. त्यावरून भाजपच्या आमदारांनी तीव्र विरोध दर्शविला. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट खुले पत्र लिहून नवाब मलिकांना विरोध दर्शविला आहे. अजित पवारांनी थेट नवाब मलिकांना पाठिंबा दर्शविला नाही. भाजप नाराज होईल, हेही अजित पवारांची मनात असावे. लोकसभा निवडणुकीनंतर भाजप राष्ट्रवादीला नवाब मलिक प्रकरणावरून सोडचिठ्ठी देऊ शकते, असे बोलले जात आहे. हे खुद्द अजित पवार गटातील दोन-तीन आमदारच अनौपचारिक गप्पा मारताना पत्रकारांशी बोलून गेले आहेत. त्यामुळे या आमदारांनाही भाजप आपल्यावर नवाब मलिक प्रकरण उलटवतील, असे वाटत आहे.

Corona JN.1 Variant: मुख्यमंत्र्यांकडून आरोग्य यंत्रणेचा आढावा; घाबरू नका, काळजी घ्या, एकनाथ शिंदेंचे आवाहन

राष्ट्रवादीचे आता गरज काय ?
देशातील मूड हा नव्या वळणावर आहे. राम मंदिर, नवीन संसद उभारून झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा करिश्मा अजूनही आहे. अशा वेळी राष्ट्रवादीचे काँग्रेसची आता गरज काय ? असा प्रश्न येतो. तर महाराष्ट्रातून लोकसभेला भाजपचा चाळीसपेक्षा जास्त जागा निवडून आणण्याच्या आहेत. तोपर्यंत अजित पवार यांची साथ घ्यायची आहे. त्यानंतर नवाब मलिक व इतर मुद्दांवरून अजित पवारांना बॅकफूटवर टाकायचे आहे, अशी शंका राष्ट्रवादीचे आमदारांच्या मनात आहे.

अजित पवारांची रेशीमबागेकडे पाठ का ?
हिवाळी अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या आमदारांना थेट राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या मुख्यालय रेशीमबागेचे निमंत्रण होते. परंतु तिकडे शिवसेनेचे मुख्यमंत्री, आमदार गेले. परंतु अजित पवार तिकडे फिरकले नाहीत. तर अमोल मिटकरी यांनी आपल्या पक्षाची भूमिका जाहीर केली आहे. आम्हाला संघ भूमीचे नाही, तर दीक्षा भूमी मार्गदर्शन आहे. मिटकरे असे बोलणे म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपचा थेट अपमान असल्याचे बोलले जात आहे.

शिंदेंच्या आमदार, खासदारांना कमळाचे आकर्षण
राज्याच्या निवडणुका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवू, असे देवेंद्र फडणवीस हे म्हणत आहे. परंतु तीन राज्यातील निवडणुकीत काय झाले हे आपण बघितले आहे. मध्य प्रदेशमध्ये शिवराजसिंह चौहान, राजस्थानमध्ये वसुंधराराजे या चेहऱ्यांना बेदखल करण्यात आले आहे. त्यात शिंदेंच्या आमदार, खासदारांना कमळ चिन्हाचे आकर्षण वाटत आहे. शिवसेना संपविण्याचा हा एक प्लॅन असल्याचे शंका कुणाला येऊ शकते. असे झाले तर शिंदेंना हा मोठा धोका आहे.

अजित पवारही सावध
भाजप आपल्याबरोबर दगाफटका करू शकतो, ही शंका अजित पवारांच्या मनात असणार आहे. त्यामुळे आपल्या आमदारांना जास्तीत जास्त निधी देण्याचा प्रयत्न ते करत आहे. अधिवेशनाच्या पुरविण्या मागण्यात हे दिसून येत आहे. निधी कसा आणायचा ? निवडणुकीला कसे सामोरो जायचे आहे हे अजित पवारांना चांगलेच माहिती आहेत. त्यामुळे तेही सावध पावले टाकत आहेत.


अजित पवारही समीकरणात बसेनात

राम मंदिर, आक्रमक राष्ट्रवाद, हिंदुत्वाची मतपेटी, नरेंद्र मोदी यांचा चेहरा हे सारे चौकोनी समीकरण भाजपकडे आहे. या समीकरणात अजित पवार हे बसत नाही, असे भाजप नेत्यांना वाटत आहे. तसेच अजित पवार व त्यांच्या आमदारांनी रेशीम बागेत न जाणे हे भाजपला आणि संघाला आवडलेले नाही. यो दोन्ही फटीमुले राजकीय मतभेद दिसून येत आहे. अजित पवार हे थेट शरण जातील, असा त्यांचा स्वभाव नाही. दुसरीकडे छगन भुजबळ हे आक्रमक झालेले आहेत. त्यांच्याबाबत अजित पवार हे काहीच भूमिका घेत नाहीत. तो ही गेम प्लॅन अजित पवारांचा आहे, असे वाटत आहे.

Tags

follow us