Download App

NCP Breaking : राष्ट्रवादीचा ‘दादा’ नेता सात आमदारांसह नॉट रिचेबल?

  • Written By: Last Updated:

NCP Breaking : राष्ट्रवादी काँग्रेसचा एक ‘दादा’ नेता त्यांच्या पक्षाच्या सात आमदारांसह फोन नॉट रिचेबेल असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात असून त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत. हा नेता आज सकाळी पुण्यामध्ये होता. त्यानंतर सात आमदारांसह संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

नॉट रिचेबल असल्यामुळे काही राजकीय कारण आहे का, असाही प्रश्न विचारला जात आहे. कोविडमुळे हा नेता महाराष्ट्र बाहेर गेला असावा अशी ही शक्यता व्यक्त होत आहे. पण सोबत सात आमदार कशासाठी अशी शंका व्यक्त करण्यात आली आहे.
हे सात आमदार कोण याची माहिती मिळू शकली नाही. पण पुणे जिल्हा परिसरातील हे आमदार असावेत, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

राज्याच्या राजकारणात काहीही घडू शकते, असे गेल्या तीन वर्षांत दिसून आले आहे. आता पुन्हा तसेच काही होत नाही ना, असे वातावरण पुन्हा निर्माण झाले आहे.

Hindenburg Case : शरद पवार उतरले अदानी यांच्या बचावासाठी! म्हणतात… जेपीसीची मागणी निरर्थक! – Letsupp

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आयोध्या दौऱ्यावर जात असण्याच्या २४ तास आधीच या घडामोडी घडल्याने त्याविषयी उत्सुकता व्यक्त होत आहे. यापूर्वी हा नेता याआधी पण असाच नॉट रिचेबल झाला होता. त्यामुळे लोकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Tags

follow us