Nitesh Rane On Sanjay Raut : आज खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule)आणि प्रफुल्ल पटेल (Praful Patel)यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस (Nationalist Congress)पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्याचवेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवारांवर (Ajit Pawar) अन्याय झाल्याचा सूर अनेक ठिकाणी उमटू लागला आहे. यावरुन भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane)यांना विचारण्यात आले की, अजितदादांना डावलल्यानंतर त्यांच्यासाठी भाजपचे रस्ते मोकळे झाले आहेत का? त्यावर नितेश राणे म्हणाले की, त्याबद्दल अजितदादाच सांगू शकतात. माझा प्रश्न एवढाच होता की, सामनामध्ये पेढे का वाटले? त्याच्याबद्दल थोडं संशोधन आपण सर्वजण करुच, मीपण मुंबईला जाऊन तेच करतो, असंही राणे म्हणाले.
कार्यकारी अध्यक्षपदी सुप्रिया सुळे अन् प्रफुल्ल पटेल यांची निवड का? शरद पवारांनी सांगितलं कारण
नितेश राणे म्हणाले की, माझा पक्ष भारतीय जनता पक्ष आहे मी त्याच्यावर कसं काय बोलू शकतो? असं म्हणत मला फक्त आता पार्थ पवारांची चिंता वाटते, माझा मित्र आहे तो, मला वाटतं की, त्यानं आता चांगल्या मोठ्या पदावर आलं पाहिजे होतं, चांगला होतकरु असा कार्यकर्ता आहे, म्हणून आजच्या निमित्ताने पार्थची चिंता वाटते, असंही नितेश राणे म्हणाले.
अजितदादांवर अन्याय झाला का? जयंत पाटलांनी एका वाक्यात स्पष्टपणे दिलं उत्तर
त्याचवेळी पत्रकारांनी संजय राऊत म्हणाले की, शिवसेना एकनाथ शिंदेंनी फोडली नसून ती भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने फोडली त्यावरुन नितेश राणे म्हणाले की, नेहमी शिवसेनेबद्दल बोलायचं, नेहमी भाजपबद्दल बोलायचं पण त्यांनी जे काही उद्धव ठाकरेंना रस्त्यावर आणलंय त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही, नेहमी दुसऱ्यांच्या घरातले बारसे करत बसायचे, स्वतःबद्दल कधी काही विचार करायचा नाही, कधीतरी तू तुझ्या मालकाची काय अवस्था करुन ठेवलीय त्याच्याबद्दल सामनामध्ये एखादा अग्रलेख होऊन जाऊदे असं म्हणत नितेश राणेंनी संजय राऊतांवर टीका केली आहे.
त्याचवेळी नितेश राणेंची अमरावतीमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यर्त्यांनी गाडी अडवल्यावरुन प्रश्न विचारण्यात आला त्यावर राणे म्हणाले की, चार कार्यकर्ते शिल्लक सेना असं आम्ही म्हणतो. मी कार्यक्रमाच्या आतमध्ये होतो, तेव्हा मला कोणीतरी सांगितलं की, चार टकली आली उद्धव ठाकरेंची ती नाचत होती, शिल्लक सेना त्याला म्हणतात, पहिले कसं बाळासाहेबांची शिवसेना ताफे अडवायची आता याला शिल्लक सेना असं म्हणतात, असा टोला आमदार नितेश राणे यांनी लगावला आहे.