Download App

Sharad Pawar : ‘इंडिया’त धुसफूस? पवारांनी सांगितला डॅमेज कंट्रोलचा प्लॅन!

Sharad Pawar on India Alliance : देशात आता लोकसभा निवडणुकांची (Lok Sabha Election) जोरदार तयारी सुरू झाली आहे. केंद्रातील सत्ताधारी भाजपला टक्कर देण्यासाठी विरोधकांनी इंडिया आघाडी (India Alliance) तयार केली आहे. लोकसभा निवडणुका एकत्रित लढणार असल्याचे सांगितले जात असले तरी निवडणुकीतील जागावाटपावरून इंडिया आघाडीत धुसफूस वाढत असल्याचेही दिसून येत आहे. काही राज्यात आम आदमी पार्टीने स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे. तसेच पंजाबातील सध्याच्या राजकीय घडामोडींवरून आप आणि काँग्रेस यांच्यातील तणाव वाढला आहे. या सगळ्या घडामोडी घडत असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी महत्वाचे वक्तव्य केले आहे.

शरद पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत. बारामतीमधील त्यांच्या गोविंदबाग या निवासस्थानी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या ते भेटी घेणार आहेत. बारामतीत पोहोचल्यानंतर शरद पवारांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर काही राज्यांमध्य इंडिया आघाडीतील पक्षांमध्ये मतभेद असल्याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला.

धक्कादायक! देशातील 42 टक्के ग्रॅज्यूएट बेरोजगार; एमबीए, इंजिनिअरांना व्हायचंय ‘कारकून’

त्यावर पवार म्हणाले, सध्या चार राज्यांतील निवडणुकांवर लक्ष केंद्रीत केले आहे. निवडणुका येतील तेव्हा काही जागांबाबत मतभेद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे प्रश्न उपस्थित होतात त्यावेळी त्या राज्यात ज्यांचा रस नाही अशा लोकांना तिथे पाठवून त्या मतभेदांवर मार्ग काढण्याचा प्रयत्न करू. अद्याप ही प्रक्रिया सुरू केलेली नाही. मी मुंबईत जाईल त्यानंतर काँग्रेस व इतर पक्षीय नेत्यांशी चर्चा करून यावर वाद होणार नाहीत याची काळजी घेऊ. पुढील आठ ते दहा दिवसात हे होईल.

पवारांचा मोदी सरकारला इशारा

केंद्र सरकारने कांद्यावर 40 टक्के निर्यात शुल्क लावले आहे. याचा मोठा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसतो आहे. मुळात कांदा हे जिरायती पीक आहे. त्यामुळे केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय अत्यंत चुकीचा आहे. या संदर्भात आता केंद्रीय मंत्री पियुष गोयल बैठक घेणार आहेत. त्यात या प्रश्नावर तोडगा निघाला तर आनंदच आहे. अन्यथा शेतकऱ्यांची अस्वस्थता थांबवता येणार नाही, असा इशारा पवार यांनी दिला.

Sharad Pawar : ‘हा तर पत्रकारांना बेइज्जत करण्याचा प्रकार’; पवारांनी टोचले बावनकुळेंचे कान

Tags

follow us