Supriya Sule : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फुट पडल्यानंतर आता अजित पवार गट (Ajit Pawar) आणि शरद पवार गट (Sharad Pawar) असे दोन वेगवेगळे गट पडले आहेत. तसेच या रस्सीखेचमध्ये अजित पवार गटाला पक्ष आणि चिन्हही देण्यात आलं आहे. अशातच पुढील काळात अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार का? अशी चर्चा रंगू लागली आहे. हीच चर्चा असताना अजित पवारांनी आमचं फाटलं तर दुसरीकडे सुप्रिया पवार यांनी पक्षात अन् कुटुंबात फुट नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता नेमकं खरं काय? असं बोललं जात आहे.
Dry Ice म्हणजे काय? ज्यामुळे गुरूग्रामच्या हॉटेलमध्ये ग्राहकांना रक्ताच्या उलट्या झाल्या
काही महिन्यांपूर्वीच राष्ट्रवादी पक्षात फुट पडली. अजित पवार यांच्यासह समर्थक आमदारांनी भाजपसोबत हातमिळवणी करुन सत्तेत सामिल होण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर शरद पवार यांनी अजितदादांच्या भूमिकेला विरोध केल्याचं दिसून आलं होतं.
अजित पवार गटाची फुट पडल्यानंतर अजित पवारांकडून पक्ष आणि चिन्हावर दावा करण्यात आला. निवडणूक आयोगाकडून सुनावणीनंतर अखेर बहुमताच्या आधारावर अजित पवार गटाला पक्ष आणि चिन्ह बहाल करण्यात आलं होतं. तसेच विधी मंडळात अपात्र आमदार प्रकरणातही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी अजित पवार यांचीच राष्ट्रवादी खरी असल्याचा निकाल दिला होता.
दुसऱ्यांच्या खिशात हात घालणे हाच ठाकरेंचा उद्योग; मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंवर घणाघात
निवडणूक आयोग आणि विधी मंडळाच्या निकालानंतर शरद पवार गटाकडून सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यात आली. या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे. अशातच आता काही दिवसांनंतर आगामी लोकसभा निवडणूका येऊन ठेपल्या आहेत. त्यासाठी महाविकास आघाडीकडून शरद पवार गट तर महायुतीकडून अजित पवार एकमेकांसमोर उभे ठाकल्याची परिस्थिती आहे.
अजित पवार गटाकडून काल शिरुरमध्ये जाहीर मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात अजित पवार यांनी शरद पवार आणि मी एकत्र येण्याबाबत स्पष्ट शब्दांत सांगितलं आहे. हे सगळं मनातून काढून टाका ते तिकडच्या बाजूला आहेत आणि आम्ही आता इकडच्या बाजूला आहोत. त्यामुळे आता अजित पवार आणि शरद पवार यांच्यात फाटलं असल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. तर दुसरीकडे सुप्रिया सुळे यांनी पक्ष अन् कुटुंबात फुट नसल्याचं सांगितलं आहे.