NCP Crisis : शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी अजित पवार गटातील अनेक आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला होता. त्यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू असतानाच मंत्री धर्मरावबाबा अत्राम यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. जयंत पाटीलच अजित पवार गटाच्या संपर्कात आहेत, असा खळबळजनक दावा मंत्री आत्राम यांनी केला आहे. आत्राम म्हणाले, शरद पवार गटाचे नेते जे दावा करत फिरत आहेत की आमच्या संपर्कात अजित पवार गटाचे 15 आमदार आहेत. मात्र दावा करणारे जयंत पाटील हेच आमच्या संपर्कात आहेत. जे बोलणारे आहेत ते देखील येतील अस आत्राम म्हणाले. आमच्या गटाच्या आमदारांत कोणतीही नाराजी नाही. दर मंगळवारी अजित पवार आमदारांची बैठक घेतात. त्यांच्या समस्या, मतदारसंघातल्या अडचणी ऐकून घेतात. हे आधी होत नव्हतं म्हणून सर्व आमदारांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
पुन्हा राजकीय भूकंप! अजित पवार गटातील अनेक आमदार आमच्या संपर्कात; जयंत पाटलांचा दावा
अजितदादा डॅशिंग नेते आणि त्यांची प्रशासनावर चांगली पकड आहे. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेऊन अनेक आमदार त्यांच्यासोबत आले. महाविकास आघाडीत असताना दादांनी आमदार, खासदारांना भरपूर निधी दिला. त्यानंतर दुसरं सरकार आल्यानंतर त्यावर स्थगिती मिळाली होती. पंरतु, अजितदादा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर ही स्थगिती उठली असेही आत्राम म्हणाले.
गडचिरोलीतून लढण्यास इच्छूक
शरद पवार गटाचे राहिलेले आमदार आमच्या संपर्कात आहेत. त्यामुळे लवकरच आमच्या गटाच्या आमदारांचा आकडा 53 वर पोहोचणार आहे. आमची लोकसभेची मिशन 45 ची तयारी सुरू झाली असून मी गडचिरोली लोकसभा मतदारसंघात लढायला इच्छुक आहे, असे मंत्री आत्राम यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.
NCP च्या दोन्ही गटाकडून 5 राज्यांच्या निवडणुका न लढण्याचा निर्णय, नेमकं कारणं तरी काय?
काय म्हणाले होते जयंत पाटील ?
अजित पवार गटाचे अनेक आमदार आमदार संपर्कात आहेत. अनेकांना परत पक्षात यायचं आहे. त्याबाबत विचार सुरू आहे. पण मी आत्ताच त्याच्या खोलात जाणार नाही. आज त्यांची अडचण होऊ नये, असं मला वाटतं. त्यांची काही कामं आहेत, ती झाली पाहिजेत. त्यांच्या मार्गात अडथळा निर्माण करणार नाही. योग्य वेळ आली की, पाहू आणि काय ते ठरवू, असं जयंत पाटील म्हणाले. त्यानंतर जयंत पाटील यांनी अंतिम निर्णय शरद पवारच घेतील, असंही म्हटलं आहे.