Download App

NCP Crisis : ‘युद्धा’त सारं क्षम्य; तटकरे यांचा शरद पवारांना इशारा

NCP Crisis : अजित पवारांचा गट भाजपासोबत जाऊन आता तीन महिने उलटून गेले आहेत. आता अजित पवार (Ajit Pawar) आणि त्यांच्याबरोबर गेलेले आमदार सरकारमध्ये स्थिरावले आहेत. तर दुसरीकडे शरद पवार (Sharad Pawar) पक्षबांधणीसाठी राज्याचे दौरे करत आहेत. राष्ट्रवादीवरील दाव्याचा वादही (NCP Crisis) निवडणूक आयोगाच्या कोर्टात आहे. अशी परिस्थिती असताना ज्यांना शरद पवारांनी राजकारणात मोठं केलं. अनेक पदे दिली. जे लोक पवारांना दैवत म्हणतात. विठ्ठल मानतात तेच लोक (अजित पवार गट) नंतर थेट पवार यांनाच पक्षाध्यक्ष पदावरून हटवण्याचा निर्णय घेतात हे लोकांना न उमगलेलं कोडं आहे. मात्र, या अनाकलनीय प्रश्नाचं उत्तर अजित पवार गटाचे नेते खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी दिलं आहे. लेट्सअप मराठीच्या लेट्सअप सभा या विशेष कार्यक्रमात खासदार तटकरे यांनी अनेक मुद्द्यांवर सडेतोड मते व्यक्त केली.  तसेच राजकारणात तो कटू वाटणारा निर्णय का घेतला?, याचाही खुलासा केला.

Chhagan Bhujbal : ..म्हणून शरद पवारांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला; भुजबळांनी सांगितलं नक्की काय ठरलं होतं?

‘तुम्ही शरद पवारांना दैवत म्हणता, विठ्ठल म्हणता आणि नंतर त्यांनाच पक्षाध्यक्ष पदावरून हटवता हे असं कसं होऊ शकतं? हे लोकांना कळत नाही’, असा प्रश्न लेट्सअपचे संपादक योगेश कुटे यांनी विचारला. त्यावर तटकरे म्हणाले, ‘राजकारणात ज्यावेळी एखादी भूमिका घेतली जाते त्यावेळी काही वेळा मनाला उभारी देऊनच निर्णय घ्यावे लागत असतात. राजकारणात तर तुम्ही घेतलेल्या निर्णयासोबतच तुम्हाला राहावं लागतं. म्हणून बहुतेक वेळा म्हटलं जातं की युद्धात आणि प्रेमात सर्व काही क्षम्य असतं. तसा हा निर्णय. ‘पॉलिटिकल वॉर’. लोकशाही मानणाऱ्या पक्षात बहुमताने हा निर्णय घेतला गेला. त्यावेळी या निर्णयाच्या परिणामांचा विचार करूनच आम्ही तो निर्णय घेतला होता’, अशा स्पष्ट शब्दांत उत्तर देत त्यांनी एक प्रकारे शरद पवार यांना इशाराच दिला.

शरद पवार रायगडमध्ये आले तर..

‘गेली 60 वर्षे पवार साहेब राज्याचा कानाकोपरा फिरत आहेत देशात फिरत आहेत. त्यांनी तो अधिकार मिळवला आहे. त्यामुळे उद्या जरी ते रायगडमध्ये आले तर मला हरकत असण्याचं काहीच कारण नाही. त्यावर मी जास्त काही बोलणार नाही’, असे स्पष्ट करत तटकरे यांनी या मुद्द्यावर अधिक बोलणे टाळले.

 

Tags

follow us