मोठी बातमी : बंडासाठी अजित पवारांकडे 40 आमदारांच्या सह्यांचे पत्र तयार?

NCP leader Ajit Pawar : गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात मोठ्या हालचाली सुरु आहे. राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा सध्या रंगू लागल्या आहेत. महत्वाची बाब म्हणजे राष्ट्रवादीच्या 53 पैकी 40 आमदारांनी आपल्या संमतीच्या स्वाक्षऱ्या अजित पवार यांच्याकडे दिल्या असल्याचे वृत्त द इंडियन एक्सप्रेसने दिले आहे. राष्ट्रवादीकडे सध्या स्थितीला 53 आमदार आहे. […]

Untitled Design (62)

Untitled Design (62)

NCP leader Ajit Pawar : गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात मोठ्या हालचाली सुरु आहे. राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा सध्या रंगू लागल्या आहेत. महत्वाची बाब म्हणजे राष्ट्रवादीच्या 53 पैकी 40 आमदारांनी आपल्या संमतीच्या स्वाक्षऱ्या अजित पवार यांच्याकडे दिल्या असल्याचे वृत्त द इंडियन एक्सप्रेसने दिले आहे. राष्ट्रवादीकडे सध्या स्थितीला 53 आमदार आहे. तर पक्षांतर बंदी कायद्याच्या नियमानुसार वेगळा गट स्थापन करण्यासाठी 36 आमदारांची गरज आहे. यामुळे महाविकास आघाडीला डावलत येत्या काळात अजित पवार हे भाजपसोबत दिसणार का असा प्रश्न राजकीय वर्तुळात निर्माण झाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून अजित पवार हे राष्ट्रवादीत अस्वस्थ आहे अशा चर्चा समोर आल्या आहेत. यातच भाजपचे नेतेमंडळी देखील कोणी आमच्या सोबत येणार असेल तर त्यांचे स्वागतच आहे, असे म्हणत एक प्रकारे या बातम्यांना हवा देत आहे. यामुळे अजित पवार पुन्हा एकदा बंडाच्या तयारीत आहे का ? असा सवाल निर्माण होत आहे. यातच अजित पवार यांचं या विषयावर असलेले मौन देखील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरते आहे.

दरम्यान भाजपसोबत युती करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचे उत्तराधिकारी होण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या प्रयत्नांना त्यांच्या पक्षातील आमदारांच्या संमती सह्या मिळाल्याने वेग आला आहे. आतापर्यंत राष्ट्रवादीच्या 53 पैकी 40 आमदारांनी संमतीच्या स्वाक्षऱ्या दिल्या आहेत. वेळ आल्यावर ही यादी राज्यपालांना सादर केली जाईल,अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.दरम्यान राष्ट्रवादीकडे सध्या स्थितीला 53 आमदार आहे. तर पक्षांतर बंदी कायद्याच्या नियमानुसार वेगळा गट स्थापन करण्यासाठी 36 आमदारांची गरज आहे.

उद्धव ठाकरेंविरुद्ध बंड करणाऱ्या सेनेच्या खासदारांना सर्वोच्च न्यायालय अपात्र ठरवेल, असे गृहीत धरून अजित पवार यांच्याकडून ही खेळी खेळवली जात असल्याचे दिसते आहे. मात्र, या सर्वावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे खडखडीत मौन आहे. अजित पवार राष्ट्रवादीच्या आमदारांना त्यांच्या सह्या घेण्यासाठी वैयक्तिकरित्या बोलावत असताना, ज्येष्ठ पवारांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

2019 मध्ये देखील अजित पवार यांनी ठणकावल्यानंतर, शरद पवार यांनी आपला पक्ष अबाधित ठेवण्यासाठी राष्ट्रवादीच्या सर्व खासदारांना बोलावले होते. दरम्यान नुकतेच अजित पवार यांनी पुण्यातील नियोजित कार्यक्रम रद्द केले होते. त्यांनी जवळच्या काही विश्वासूंसोबत चर्चा सुरू ठेवण्यासाठी मुंबईत थांबले होते.

काँग्रेसचे दूत ‘मातोश्री’वर, ठाकरेंची भेट घेत दिले दिल्लीवारीचे आमंत्रण

अपक्ष आमदार रवी राणा म्हणाले की, जेव्हा नरेंद्र मोदी ,अमित शहा हिरवा कंदील देतील, तेव्हा अजित पवार हे भाजप सोबत जातील. देशाचे पंतप्रधान व गृहमंत्री यांचा हिरवा कंदील केव्हाही देऊ शकते. भाजप पक्ष सध्या शिंदे यांच्या बाहेर पडण्याच्या आधी किंवा नंतरच्या पर्यायांचा विचार करत आहे. दरम्यान अद्याप सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येणे बाकी आहे. दरम्यान शरद पवारांच्या जवळचे मानले जाणारे राष्ट्रवादीचे अनेक ज्येष्ठ आमदारही अजित पवारांच्या सत्ताबदलाला पाठिंबा देत आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Exit mobile version