Download App

‘बूंद से गयी वो हौद से नही आती’; जाहिरातीवरुन अजितदादांचा निशाणा

Ajit Pawar On Eknath Shinde :  राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिवसेनेच्या जाहिरातीवरुन निशाणा साधला आहे.  जाहिरात देणार तो हितचिंतक कोण आहे. आज जाहिरात बदलली आहे. त्या जाहिरातीमध्ये काय मजकूर आहे तो आपण सगळ्यांनी पाहिला. जाहिरात बदलून आता शिवसेना व भाजप यांची चिन्ह टाकलेली आहेत. त्यामध्ये अमित शाह बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांचा फोटो टाकलेला आहे. काल ज्या गोष्टीवर आक्षेप घेण्यात आल्या त्या सर्व गोष्टी आज जाहिरातमध्ये टाकण्यात आल्या.

आता कालच्या जाहिरातीवर सारवासारव करण्याचा प्रयत्न हा आजच्या जाहिरातीमधून झाला आहे का? असा प्रश्न उपस्थित होत असल्याचे पवार म्हणाले. तसेच  ‘बूंद से गयी वो हौद से नही आती’, असे म्हणत त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.

जाहिरात नाट्य : भाजपची नाराजी दूर करण्यासाठी शिवसेना नेत्यांची ऊर फुटेपर्यंत धावाधाव अन् दमछाक

शिवसेनेने कालच्या जाहिरातीवर उत्तर द्यायला पाहिजे होते. पूर्वीच्या जाहिरातीमध्ये देशात नरेंद्रजी आणि राज्यात देवेंद्रजी अशी घोषणा होती. परंतु आता या घोषणेचं काय झालं याबद्दल पण काही उल्लेख करायला ते तयार नाही. काल काही वर्तमान पत्रात एकनाथ शिंदे यांच्या लोकप्रियतेबद्दल जाहिरात पाहण्यात आली. या जाहिरातीवरून अनेकांनी आपआपली मते मांडण्यास सुरूवात केली आहे.

काल एकनाथ शिंदे यांची लोकप्रियता दर्शवणारी जाहिरात काही वृत्तपत्रांमध्ये प्रकाशीत करण्यात आली होती. या जाहिरातीत मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या लोकप्रियतेची टक्केवारी देण्यात आली होती. यावरून अजित पवारांनी प्रश्न उपस्थित करत 74 टक्के लोकांना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको आहेत का असा तर्क लावला. तसेच आज देण्यात आलेली जाहिरात म्हणजे कालच्या चुका दुरूस्त करण्याचा प्रयत्न असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

 

Tags

follow us