Ajit Pawar And Devendra Fadnavis : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरु होती. मात्र आता खुद्द अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत या अफवांना पूर्णविराम दिला आहे. मी राष्ट्रवादीमध्येच राहणार असल्याचे अजित पवार म्हणाले आहे. तसेच माझ्याविषयी सारख्या अफवा पसरवल्या जात आहे. मी राष्ट्रवादीमध्ये राहणार असल्याचे यावेळी पवार यांनी स्पष्ट केले असे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी म्हंटले आहे.
गेल्या काही दिवसांपासून अजितदादा हे भाजपसोबत जाणार अशी चर्चा सबंध राजकीय वर्तुळात होती. त्यातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील या काळात कुठेही चर्चा करताना दिसले नाहीत. ज्यावेळी एकनाथ शिंदे हे आपल्या आमदारांसह सुरत व गुवाहाटीला गेले होते, तेव्हा देखील फडणवीसांनी माध्यमांसमोर कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. पण आता अजितदादांच्या स्पष्टीकरणानंतर ही चर्चा आता तरी थांबलेली आहे. या सर्व घटनेनंतर अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांना फोन केला आहे.
त्यांच्या या फोनमुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. पण हा फोन राष्ट्रवादीच्या आमदारांच्या मतदारसंघातील विकास कामांसाठी केला असल्याचे सांगण्यात आले आहे. एबीपी माझा वृत्त वाहिनीने याबाबतची माहिती दिली आहे. आमदार शेखर निकम, अनिल पाटील व अण्णा बनसोडे यांच्या मतदारसंघातील विकासकामांसाठी अजितदादांनी फडणवीसांना फोन केल्याचे त्यांनी स्वत: सांगितले आहे. पण गेल्या काही दिवसांपासून अजित पवारांविषयी चालू असलेली चर्चा पाहता, या फोनला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.
दरम्यान, याआधी अजितदादांनी कारण नसताना माझ्याबाबत जाणीवपूर्वक गैरसमज निर्माण झाल्याचे म्हटले आहे. तसेच काही नेतेमंडळींनी देखील अशा अफवा पसरवण्याचे काम केले आहे. तसेच सध्या माध्यमांमध्ये सुरु असलेल्या चर्चांमध्ये काहीही तथ्य नसल्याची प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली. माझ्याबाबत चुकीच्या बातम्या दाखवल्या जात आहेत. 40 आमदारांच्या सह्या घेतलेल्या नाहीत. असे पवार यांनी स्पष्ट केले.