कोण ते उघडे नागडे शेणगोळ घेऊन आले; भुजबळांमधील ‘सत्यशोधक’ झाला जागा

Chhagan Bhujbal On PM Modi : राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाच्या रौप्य महोत्सवानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृह येथे कार्यक्रम पडला. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधीपक्ष नेते अजित पवार, पक्षाचे नवीन कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल व सुप्रिया सुळे, छगन भुजबळ आदी नेते उपस्थित होते. यावेळी छगन भुजबळ यांनी पंतप्रधान नरेंद्री मोदींवर जोरदार निशाणा साधला. नवीन  […]

Letsupp Image   2023 06 21T165323.811

Letsupp Image 2023 06 21T165323.811

Chhagan Bhujbal On PM Modi : राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाच्या रौप्य महोत्सवानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृह येथे कार्यक्रम पडला. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधीपक्ष नेते अजित पवार, पक्षाचे नवीन कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल व सुप्रिया सुळे, छगन भुजबळ आदी नेते उपस्थित होते. यावेळी छगन भुजबळ यांनी पंतप्रधान नरेंद्री मोदींवर जोरदार निशाणा साधला. नवीन  संसदेच्या उद्घाटनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेंगोल स्थापित केला होता, त्यावर भुजबळांनी जोरदार टोलेबाजी केली.

या देशात काय पहावे लागत आहे. कोण ते उघडे नागडे संसदेत येतात, ते दांडुक घेऊन चालतात काय?, असे म्हणत भुजबळांनी मोदींना सुनावले. पंतप्रधान हे संसदेत शेणगोळ घेऊन आले. पुढे, माघे उघडे नागडे बंबे लोक उभे होते, असे म्हणत त्यांनी मोदींची खिल्ली उडवली.  पहिल्या भारताच्या सरकारमध्ये डॉ. राजेंद्रप्रसाद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी नेते होते. आता मात्र, हे लोक आहेत, असे म्हणत भुजबळांनी मोदींवर निशाणा साधला. तसेच ओडिशा येथील ट्रेन अपघात झाला त्यावर देखील भुजबळांनी भाष्य केले. हे म्हणतात की डबल इंजिनचे सरकारचे पाहिजे. पण ओडिशामध्ये ट्रिपल इंजिन झाले. त्यामध्ये 300 लोक मारले गेले. यानंतरदेखील मोदी ट्रेनला हिरवा झेंडा दाखवत होते, असे भुजबळ म्हणाले.

गद्दारी करायची असती तर राज ठाकरेसोबत केली असती, गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर हल्लाबोल

यावेळी शिंदे सरकारच्या जाहिरातीवरुनदेखील त्यांनी टोलेबाजी केली. देशात मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे आणि फडणवीस गुल. हे बाळासाहेबांची शिवसेना म्हणतात आणि त्यांचाच फोटो छापत नाही. यानंतर दुसऱ्या दिवशीच्या जाहिरातीमध्ये फक्त शिंदेंच्या मंत्र्यांचे फोटो लावले. यानंतर जो सर्व्हे आला त्यामध्ये फडणवीसांना 35 टक्के पसंती आहे, हे कोणीतरी देते आणि मीडिया छापायचे काम करतो, असे भुजबळ म्हणाले.

महागाई, बरोजगारीवरुन खासदार कोल्हेंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

यावेळी त्यांनी अहमदनगरच्या नामातांवरुनदेखील भाष्य केले. यांना अहिल्यादेवींच्या इतिहास माहित नाही. पुण्यामध्ये होळकर पेशव्यांना भेटण्यासाठी आले होते. तेव्हा पेशव्यांनी रात्री त्यांच्यावर हल्ला केला. त्यांचे राज्य बळकावले. पुढे यशवंतराव होळकरांनी पेशव्यांना हरवले. अहिल्यादेवींच्या जयंतीच्या कार्यक्रमात शिंदे व फडणवीसांना पुणेरी पगड्या घालण्यात आल्याचे भुजबळ म्हणाले.

Exit mobile version