Chhagan Bhujbal On Prakash Aambedkar : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यावर निशाणा साधला आहे. काही दिवसांपूर्वी आंबेडकर यांनी भुजबळांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा असे म्हटले होते. त्याला आता भुजबळांनी प्रत्युत्तर दिले आहे. तुम्हाला जनतेची कामे करायची असेल तर सत्तेत राहून लढा द्यावा लागेल. बाबासाहेबांचे म्हणणे प्रकाश आंबेडकरांना त्यांना मान्य नाही का?, असे म्हणत त्यांनी आंबेडकरांना टोला लगावला आहे.
महाराष्ट्र सदनामध्ये सर्वांचे पुतळे आहे. फुले, शाहू, आंबेडकर यांचे पुतळे आहे. त्यासाठी प्रावधान नसताना पुतळे बसविले असून त्याला मोठा खर्च झाला आहे. पुतळे हटविल्यावर मला जे म्हणायचे आहे ते म्हटलो, असे भुजबळ म्हणाले आहे. तुम्हाला जनतेची कामे करायची असेल तर सत्तेत राहून लढा द्यावा लागेल
बाबासाहेबांचे म्हणणे प्रकाश आंबेडकरांना मान्य नाही का ? असे शब्दा त्यांनी प्रकाश आंबेडकरांना सुनावले आहे.
https://letsupp.com/politics/nana-patole-on-action-mod-53261.html
फुले दाम्पत्यांसंदर्भात गलिच्छ लिहिलं गेलं तेव्हा आंबेडकर काही बोलले नाही. आंबेडकरांचे काम होते, याबाबत बोलायला पाहिजे होते. तुम्हाला कोणी रोखलं होतं बोलायला. पण बोलले नाही. त्यांच्याकडून अपेक्षा होती, असे भुजबळ म्हणाले. याआधी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीच्या दिवशी सावित्रीबाई फुले व अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा हटविण्यात आल्याचा आरोप भुजबळांनी केला होता. त्यावर आता भुजबळांनी ओबीसींचे नेते म्हणून आमदारकीचा राजीनामा द्यावा, अशी आंबेडकरांनी केली होती. त्याला भुजबळांनी उत्तर दिले आहे.
यावेळी त्यांना सुनील तटकरे यांच्या नाराजीवर देखील विचारण्याता आले. याबाबत त्यांना विचारलं पाहिजे. शिवराज्याभिषेक सगळ्यांनी आनंदाने साजरा करायला पाहिजे. सरकाराचा कार्यक्रम पक्षाचा नसतो. सगळ्यांना समानतेची वागणूक दिली पाहिजे. सनातन धर्म पाळणारे महाराजांचा राज्याभिषेक होऊ शकत नाही असे म्हंटले होते. सनातन धर्माबाबत अनेक ठिकानी लिहिलं गेलं, असे भुजबळांनी सांगितले.