Download App

“मंत्रिपद माझ्या नशिबात, मी शंभर टक्के मंत्री होणार”, राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याला फुल्ल कॉन्फिडन्स!

मी शंभर टक्के मंत्री होणार आहे. मंत्रिपद माझ्या नशीबात आहे. आतपर्यंत मी चार वेळा निवडून आलो चारही वेळा मंत्री झालो.

Maharashtra Politics : मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर सत्ताधारी पक्षांतील अनेक आमदार नाराज झाले आहेत. त्यांच्याकडून नाराजी जाहीरपणे व्यक्त केली जात आहे. काही जणांना मंत्रिपद मिळालं पण आवडतं खातं मिळालं नाही म्हणूनही ते नाराज आहेत. पण माजी मंत्री धर्मरावबाबा अत्राम मात्र याला अपवाद आहेत. आता जरी मंत्रिपद मिळालं नसलं तरी ते मंत्रि‍पदाबाबत प्रचंड आशावादी आहेत. मी शंभर टक्के मंत्री होणार आहे. मंत्रिपद माझ्या नशिबात आहे. आतपर्यंत मी चार वेळा निवडून आलो चारही वेळा मंत्री झालो असे सांगून अडीच वर्षे वाट पाहण्याचा निर्णय घेतला आहे, असे माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे.
बाप तो ‘बाप’ रहेगा! अहेरीत धर्मराबाबा आत्राम यांचा विजय, मुलीचा दारूण पराभव 

महायुतीच्या मंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतर लगेचच हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. त्यानंतर खातेवाटप रखडलं होतं. अधिवेशन संपताच खातेवाटप जाहीर करण्यात आलं. पण एकूणच मंत्रिपद मिळालं नाही म्हणून सत्ताधारी पक्षांत नाराजी होतीच. छगन भुजबळ यांनी या नाराजीला वाट करुन दिली. त्यांनी नाराजी उघडपणे बोलून दाखवली. त्यांच्या नाराजीवर आत्राम यांनीही भाष्य केलं आहे.

भुजबळांची नाराजी स्वाभाविक आहे. मी अजितदादांसोबत मागील अडीच वर्षांपासून काम करत आहे. अडीच वर्षे थांबायचं ठरवलं आहे. तोपर्यंत पक्ष संघटनेचं काम करणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला अधिक बळकटी आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच जिल्हा परिषद ताब्यात घेण्यासाठीही प्रयत्न करणार असल्याचे आत्राम यांनी सांगितले.

शरद पवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कौतुक केलं ते योग्यच आहे. पण ते महायुतीत येतील असं आजिबात वाटत नाही. शरद पवार यांनी आता आमच्यासोबत यावं. हेच सगळ्यांचं मत आहे. त्यांच्या येण्याने पक्ष अधिक मजबूत होईल. राज्यात आणि केंद्रात दोन्ही ठिकाणी पक्षाची ताकद नक्कीच वाढेल असेही आमदार धर्मराबाबा आत्राम यांनी यावेळी सांगितलं.

माझ्या कार्यकर्त्यांना हात लावाल तर ते हात तोडल्याशिवाय राहणार नाही; भाग्यश्री आत्रामांचा इशारा

फडणवीसांनी पालकमंत्री व्हावं

गडचिरोली जिल्ह्याचा पालकमंत्री कोण व्हावा याचेही उत्तर आत्राम यांनी दिलं. ते म्हणाले, मला वाटतं गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी व्हावं. अशी माझी इच्छा आहे. जर फडणवीस पालकमंत्री झाले तर गडचिरोली जिल्हा मायनिंग हब होण्यास मदत होईल असेही आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

follow us