पक्के वैरी बनले सख्खे मित्र! इंदापुरात भरणे अन् पाटलांचं राजकीय मनोमिलन, समर्थकांना रुचणार का?

बारामतीतील इंदापुरात राजकारणातले वैरी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटील यांच्या राजकीय मनोमिलन झालं.

WhatsApp Image 2026 01 23 At 11.46.44 AM

WhatsApp Image 2026 01 23 At 11.46.44 AM

Harshvardhan Patil-Dattatray Bharane : राजकारणात एकेकाळचे वैरी असलेले कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आणि शरद पवार गटाचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्या राजकीय मनोमिलन झाल्याचं पाहायला मिळतंय. त्याला कारण ठरलंय दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचं आणि जिल्हा परिषदा निवडणुकांचं. हर्षवर्धन पाटील यांची लेक अंकिता पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावर बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद गटातून उमेदवारी घेतलीयं. दोन्ही राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्रित निवडणूक लढवणार असल्याने दोन्ही नेत्यांच्या मनोमिलनाचे नवीन पर्वच सुरु झाल्याचं बोललं जातंय. इंदापुरच्या राजकारणाची गणिते नेमकी कशी? या व्हिडिओतून जाणून घेऊयात…

“एक नातं असंही” भावा-बहिणीच्या अनोख्या नात्याची गोष्ट! पनवेलमध्ये रंगणार रौप्य महोत्सवी प्रयोग

इंदापूर तालुक्यातील हर्षवर्धन पाटील यांच्या वर्चस्वाला छेद देत दत्तात्रय भरणे यांनी आपले वर्चस्व मिळवले होते. त्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या यांनी माध्यमातून दोन वेळा कडवी झुंज देत भरणे यांचा पराभव करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यास यश आले नाही. तालुक्यातील अन्य सहकारी संस्थांच्या तसेच पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये देखील पाटील यांनी भरणे यांच्या वर्चस्वाला छेद देण्याचा प्रयत्न केला.

खुशखबर! 30 लाख कोटींची गुंतवणूक, 40 लाख रोजगार निर्मिती; मुख्यमंत्री फडणवीसांची दावोसमधून घोषणा…

नुकत्याच झालेल्या इंदापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीत पाटील यांनी प्रदीप गारटकर यांच्या आघाडीला साथ देऊन राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आव्हान मोडण्याचा प्रयत्न केला. मात्र या अटीतटीच्या लढतीत भरणे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचीच सरशी झाली. दरम्यान, पाटील यांनी विधानसभा निवडणुकीआधी भाजपशी फारकत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता. तेव्हापासून ते शरद पवार गटासोबत सक्रिय आहेत. नुकतीच शरद पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या झालेल्या बैठकीत दोन्ही राष्ट्रवादी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका एकत्र लढण्याचा निर्णय घेण्यात आला, हा दाखला देत हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळासोबत ही निवडणूक लढण्याचा निर्णय त्यांनी जाहीर करत कन्या अंकिता पाटील यांचा उमेदवारी अर्ज देखील दाखल केला.

मनोमिलनानंतर काय म्हणाले भरणे-पाटील?
माझ्यात व दत्तात्रय भरणे यांच्यामध्ये कोणतेही मतभेद नाहीत, तालुक्याच्या विकासासाठी आम्हा दोघांचेही योगदान आणि सिंहाचा वाटा आहे, असे सांगत राजकारणात वैर नसते, विचारांची लढाई असते असे सांगत हर्षवर्धन पाटील यांनी नव्या मैत्रीची घोषणा केली. ग्रामीण भागाच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलो असल्याची प्रतिक्रिया हर्षवर्धन पाटील यांनी माध्यमांना दिलीयं.

फरहान अख्तरच्या ‘120 बहादूर’ ते सनी देओलच्या ‘बॉर्डर’पर्यंत प्रजासत्ताक दिनी पाहा 7 देशभक्तीपर चित्रपट

दरम्यान, प्रदीप गारटकर यांनी इंदापूर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचा जिल्हा अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन, त्यांनी स्थानिक विकास आघाडीच्या माध्यमातून भाजपच्या साथीने निवडणूक लढवली, या निवडणुकीत त्यांना अपयश आले, मात्र नुकतेच त्यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेऊन प्रवेश देखील केला. माजी जिल्हा परिषद व बांधकाम समिती सभापती प्रवीण माने व गारटकर हे दोन नेते कृषी मंत्री भरणे व पाटील यांच्या राजकीय मनोमिलनामुळे दुरावणाऱ्या कार्यकर्त्यांना आपल्या भाजप सोबत घेऊन, या दोन्ही नेत्यांना आव्हान देण्याचा प्रयत्न करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. या अनपेक्षित समीकरणामुळे इंदापूर तालुक्याच्या राजकारणाला नवे वळण लागले असून भरणे व पाटील या दोन नेत्यांची मैत्री कार्यकर्त्यांना कितपत रुचणार? हे काही दिवसात स्पष्ट होणार आहे.

Exit mobile version