Download App

‘खिशातल्या पैशांपेक्षा अधिकचं बजेट जाहीर केलंय’; जयंत पाटलांनी सरकारवर डागली तोफ

Jayant Patil News : राज्यात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार जुंपलीयं. एकीकडे विरोधकांकडून जोरदार टीका केली जात असतानाच दुसरीकडे सत्ताधाऱ्यांकडून जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे. अशातच आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी बजेटच्या मुद्द्यावर सरकारला धारेवर धरलं आहे. खिशातल्या पैशांपेक्षा अधिकचं बजेट सरकारने जाहीर केलं असल्याचं म्हणत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारवर तोफ डागली आहे. राष्ट्रवादीच्या आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.

AUS vs WI : ऑस्ट्रेलियाचा विंडीजला दणका! तिसऱ्या सामन्यात 41 चेंडूतच चारली धूळ; मालिकाही जिंकली

जयंत पाटील म्हणाले, राज्यात अनेक गंभीर प्रश्न आहेत. कामगारांचे पगार, शिक्षकांची भरती, बेरोजगारी, महागाई शेतकऱ्यांचे प्रश्न पण अयोध्येत प्रभू रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेचा सोहळा सरकारी मंदिर असल्यासारखा सरकारने केला आहे. अयोध्येत विश्वस्त आहेत, देशातल्या अनेक लोकांनी त्यासाठी वर्गणी दिलीयं. त्यातून मंदिराचं बांधकाम सुरु आहे. या संपूर्ण घडामोडीत महत्वाचे प्रश्न आपण विसरत असल्याचं जयंत पाटील म्हणाले आहेत.

शाहिदच्या ‘तेरी बातों में ऐसा उल्झा जिया’ ॲडव्हान्स बुकिंगमध्ये धमाका; रिलीजआधीच केली…

सरकारच्या खिशात शंभर रुपये असतील तर सरकारने 260 रुपये जाहीर केले आहेत. बजेट मांडलं तेव्हा सरकारने त्यांच्याकडे जेवढे पैसे होते त्यापेक्षा 17 हजार कोटी जास्त जाहीर केलं आहे. जूनमध्ये पुरवणी मागण्यावेळी 44 हजार कोटी नसताना जाहीर केले आहेत. डिसेंबरला परत 55 हजार कोटी जाहीर केले बजेट मांडल्यावर 1 कोटी 60 लाख अधिकचे जाहीर केले आहेत. आता तुम्ही कुठं प्राधान्याने बसता आहात हे लोकसभेआधी समजलं तर चांगलं आहे. नाहीतर ते अडकून जाईल
सरकारने अनेक घोषणा केल्या असल्याची टीका जयंत पाटलांनी केली आहे.

मुंबईतल्या कल्याणमध्ये पोलिस ठाण्यात आमदाराने गोळीबार केलायं. भाजपचा आमदार गोळीबार करणारा आणि ज्याच्यावर केला तो शिंदे गटाचा पदाधिकारी आहे.
पोलिस ठाण्यातच गोळीबार केलायं. राज्यात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती कशीयं याचा अंदाज येईल. मागील अनेक वर्षांत अशी घटना कधी घडलीच नाही. सरकारचे अनेक मुद्दे आहेत पण त्यावर निवडणुकीवेळी भाष्य करणार असल्याचा इशारा जयंत पाटील यांनी दिला आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी बळकटीसाठी प्रयत्न करा, भारतावर आज 205 लाख कोटींचं कर्ज असून देशातल्या लहान मुलांवर दीड लाखांचं कर्ज आहे. दीड लाख रुपयाच्या कर्जाने त्याचा प्रवास पुढे होणार आहे. अर्थिक परिस्थिती जशी बेकारीची समस्या आहे. बेरोजगारीचा दर 10 : 45 टक्क्यांपर्यंत गेला असल्याचंही ते म्हणाले आहेत.

follow us