Download App

समृध्दी महामार्गावरील अपघातातून सरकारने धडा घेतला नाही; जयंत पाटलांचं सरकारवर टीकास्त्र

  • Written By: Last Updated:

Crane Accident Samriddhi: समृद्धी महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच आहे. आजही शहापूर तालुक्यातील सरलांभबे येथे पुलाचे काम सुरू असताना गर्डर मशीन आणि क्रेन मशीन कोसळून 20 कामगारांचा मृत्यू झाला. क्रेन आणि स्लॅबखाली अनेक जण दबले गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, एनडीआरएफच्या तुकड्या मदतीसाठी घटनास्थळी पोहोचल्या असून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. या घटनेनंतर राज्यातील विरोधी पक्षाने त्यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सरकारचा चांगलाच समाचार घेतला. (Jayant Patil on ctitiseze shinde fadnavis pawar over crane accident samriddhi)

ठाण्यातील शहापूर तालुक्यातील सरलांभबे गावाजवळ पुलाचे बांधकाम सुरू असताना गर्डर मशीन कोसळली. समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्यासाठी हा पूल बांधण्यात येत असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुर्घटनास्थळाची पाहणी केली. आणि मृतांच्या कुटूंबियांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर करत दोषींवर कारवाई करू, असं सांगितलं. यावरून पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला. जयंत पाटील यांनी ट्विट करत लिहिलं की, “ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील सरलांभबे गावाजवळ समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्यासाठी बांधला जाणारा पूल कोसळून 16 कामगारांचा मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत दु:खद आहे. मृत बांधवांना माझी भावपूर्ण श्रध्दांजली. तसेच एनडीआरफमार्फत शोधकार्य सुरू असून इतर कामगार सुखरूप बाहेर यावेत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. शासनाने मागील अपघातातून कोणताही धडा घेतलेला नाही. हे या अपघातातून हेच ​​सिद्ध होते. समृद्धी महामार्गावर वारंवार होणारे अपघात पाहता शासनाने याबाबत ठोस धोरण आखले पाहिजे. मदत जाहीर करून जबाबदारी झटकून चालणार नाही, असं ट्विट पाटील यांनी केले.

रिल्स एक विलक्षण हत्यारच, समाजाला गुंतवण्याची मोठी ताकद; राज ठाकरेंचं रिल्सस्टार तरुणांना आवाहन 

दरम्यान, ठाणे ते शिर्डी या समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे काम सुरू आहे. समृद्धी महामार्गाचे काम मंगळवारीही सकाळच्या सुमारास सुरू होते. त्याचवेळी शहापूर सरलांबे येथे पुलाचे काम सुरू असताना अचानक गर्डर आणि क्रेन कोसळली. गर्डर मशिनला जोडणारी क्रेन आणि स्लॅब तब्बल 100 फूट उंचावरून खाली असलेल्या कोसळली. यात आतापर्यंत 20 मजुरांचा मृत्यू झाला आहे. तर चार ते पाच जण जखमी झाले आहेत. मृतदेह शहापूर उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले आहेत. जखमी मजुरांवर उपचार सुरू आहेत.

 

Tags

follow us