Download App

जयंत पाटील म्हणाले…अदानींची चौकशी व्हायला विरोध नाहीच

NCP Leader Jayant Patil : सध्या अदानी प्रकरणावरून राष्ट्रवादी आणि काँग्रेसची असलेल्या भूमिकेवरून दोन्ही पक्षासह नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध पेटले आहे. जेपीसी चौकशीची गरज नाही असे वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. त्यांच्या वक्तव्यावर काँग्रेसकडून टीका होऊ लागली. मात्र आता याच मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी वक्तव्य केले आहे. अदानींच्या चौकशीला आमच्या पक्षातील लोकांनी विरोध केला नाही फक्त जेपीसीमुळे कितपत गोष्टी आपल्या हातात येतील याविषयी शंका असल्याचे यावेळी पाटील म्हणाले.

जयंत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधताना विविध विषयांवर भाष्य केले. यावेळी बोलताना पाटील म्हणाले, आमच्या पक्षाने प्रो भाजप भूमिका यापूर्वीही कधीच घेतलेली नाही, आणि अद्यापही घेतलेली नाही. कोणत्या विधानाचा भाजप सोयीस्कर अर्थ लावत असेल तर त्यासाठी आम्ही विधाने करतोय असे समजायचे कारण नाही.

अदानींचा विषय स्पष्ट आहे. लोकसभा आणि विधानसभेत शरद पवार यांनी कित्येक वर्षे काढली आहेत. जेपीसीसमोर संख्या बळाचा निर्णय होतो ही साधी भूमिका मांडली आहे. अदानींची चौकशी व्हायला विरोध नाहीच आहे, पवारांनी तसे स्पष्टही केले आहे. सुप्रीम कोर्टाने समिती स्थापन केली आहे त्यात चौकशी होणारच आहे. त्यामुळे अदानींच्या चौकशीला आमच्या पक्षातील लोकांनी विरोध केला नाही. फक्त जेपीसीमुळे कितपत काही गोष्टी आपल्या हातात येतील याविषयी शंका असल्यामुळे पवार यांनी ते विधान केले होते असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

आघाडीत बिघाडी ! राजीनामा देताना ठाकरेंनी सहकारी पक्षांना विचारात घेतले नाही, पवारांचे खळबळजनक वक्तव्य

तसेच पुढे बोलताना पाटील म्हणाले, सावरकर हे महाराष्ट्रातील आहेत. महाराष्ट्राला सावरकरांबद्दल जी भूमिका आहे तीच वेळोवेळी व्यक्त होते आहे, त्यामुळे सावरकरांबद्दल आम्ही वेगळी भूमिका व्यक्त केली आहे असे आम्हाला वाटत नाही. मुख्यमंत्र्यांनी सावरकर गौरव दिन साजरा केला. सावरकर दिनाबरोबरच अनेक प्रश्न राज्यात महत्त्वाचे आहेत.

राष्ट्रीय पक्ष दर्जा गेल्याचा मविआला फटका बसणार का? पाहा जयंत पाटील काय म्हणाले…

विशेषत: अयोध्येला मुख्यमंत्री गेले. आम्ही अवकाळीने सरकारचे लक्ष नाही म्हटल्यावर शिवारात जाऊन पाहणी करत आहेत. त्यामुळे या सरकारचे अशा मोठ्या घोषणा करुन यांचा गौरव दिन त्यांचा गौरव दिन सुरू आहे. मात्र जमीनीवर सामान्य माणसांच्या महागाईच्या विरोधात काही निर्णय नाही. अवकाळीने नुकसान झाले त्याबद्दल निर्णय नाही. यांच्या बाकीच्याच घोषणा जास्त आहेत. त्यामुळे या सरकारच्या प्रत्येक घोषणेविषयी शंका येत आहे असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.

Tags

follow us