राष्ट्रीय पक्ष दर्जा गेल्याचा मविआला फटका बसणार का? पाहा जयंत पाटील काय म्हणाले…

NCP Leader Jayant Patil : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय पक्ष दर्जा हा गेला आहे. यामुळे महाविकास आघाडीला काही फटका बसणार का? यावर राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी उत्तर दिले आहे. येत्या चार – सहा महिन्यात येणाऱ्या निवडणुकांमध्ये निवडणूक लढवून राष्ट्रीय पातळीवरील मान्यता पुन्हा सहज आम्हाला मिळेल. तसेच या निर्णयाचा महाविकास आघाडी सरकारला कोणताही फटका बसणार […]

Untitled Design (24)

Untitled Design (24)

NCP Leader Jayant Patil : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय पक्ष दर्जा हा गेला आहे. यामुळे महाविकास आघाडीला काही फटका बसणार का? यावर राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी उत्तर दिले आहे. येत्या चार – सहा महिन्यात येणाऱ्या निवडणुकांमध्ये निवडणूक लढवून राष्ट्रीय पातळीवरील मान्यता पुन्हा सहज आम्हाला मिळेल. तसेच या निर्णयाचा महाविकास आघाडी सरकारला कोणताही फटका बसणार नसल्याचा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

जयंत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधताना विविध विषयांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा गेला या विषयावर देखील आपले मत व्यक्त केले. यावेळी बोलताना पाटील म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हे चिन्ह महाराष्ट्रापुरते कायम राहिल यात शंका नाही.

पण देशातील वेगवेगळ्या राज्यात आम्ही नागालँडमध्ये निवडणूका लढवल्या तिथे सात आमदार निवडून आले आहेत. लक्षद्वीपमध्ये आमचे खासदार आहेत परंतु तिथे विधानसभा नाही. त्यामुळे ते राज्य गृहीत धरले जात नाही हेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

आघाडीत बिघाडी ! राजीनामा देताना ठाकरेंनी सहकारी पक्षांना विचारात घेतले नाही, पवारांचे खळबळजनक वक्तव्य

सर्व एजन्सीमार्फत जो वापर होतोय तो कोण व कसा करतेय त्याविषयी सतत भाष्य करण्याची आवश्यकता नाही, कारण याबाबत सर्वांना माहित आहे. परंतु राष्ट्रीय पातळीवरील दर्जा जाण्याचे जी घटना घडली आहे त्यात आम्ही काही अटी पूर्ण करु शकत नाही, त्या अटी आम्ही भविष्यकाळात पूर्ण करू असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

पाटलांचे वक्तव्यावर मिंधे गट काय बोलणार? की बोट चेपले.. दानवेंची टीका

ही घटना पक्षासाठी सेटबॅक आहे असे मला वाटत नाही कारण घड्याळ या चिन्हाचा महाराष्ट्रातील हक्क आमचा गेलेला नाही. त्यामुळे येत्या चार – सहा महिन्यानंतर हा दर्जा पुन्हा आम्हाला प्राप्त होईल. या निर्णयाने महाविकास आघाडीला फटका बसण्याची शक्यता नाही असेही जयंत पाटील म्हणाले.

Exit mobile version