‘यांच्या 10 पिढ्या बसून खातील’; आव्हाडांचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा

Jitendra Awhad On Eknath Shinde :  राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री शिंदेंची खिल्ली उडवली आहे. क्लस्टर मधून अब्जावधी रुपये मिळतील आणि पुढच्या 10 पिढ्या बसून खातील या हव्यासापोटी क्लस्टर योजना राबविल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी क्लस्टर वरून मुख्यमंत्री एकनाथ […]

Letsupp Image (71)

Letsupp Image (71)

Jitendra Awhad On Eknath Shinde :  राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री शिंदेंची खिल्ली उडवली आहे. क्लस्टर मधून अब्जावधी रुपये मिळतील आणि पुढच्या 10 पिढ्या बसून खातील या हव्यासापोटी क्लस्टर योजना राबविल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी क्लस्टर वरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. पैशांच्या हव्यासापोटी या प्रकारची क्लस्टर योजना अंमलात आणली आहे. जी पुढील 50 वर्षे पूर्ण होऊ शकत नाही, असा हल्लाबोल जितेंद्र आव्हाड यांनी केला. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खिल्ली उडवत त्यांना टोमणाही मारला.

Pune Loksabha By Election : पुणे लोकसभेच्या जागेवरुन काँग्रेस-राष्ट्रवादीत दुमत पण…

काल मुख्यमंत्री शिंदेंनी केलेल्या भाषणात आपण विधानसभेच्या गच्चीतून उडी मारून आत्महत्या केल्याची धमकी दिल्यानंतर ठाण्यातील क्लस्टरला तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी चालना दिल्याचे म्हंटले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना आव्हाडांनी मी जेव्हा पासून राजकारणा मध्ये आहे. तेव्हापासून त्यांनी कुठून उडी मारेन असे बोलल्याचे आठवत नसून त्यांनी सांगावे ते कुठे बोलले असा वक्तव्या केले. असे म्हणत त्यांची खिल्ली उडवली.

Uddhav Thackeray : “मुलांना सुट्ट्या, काही जण परदेशात”; ठाकरेंच्या दौऱ्यावर अजितदादांचा खोचक टोला

तसेच मला अडकवण्याचा प्रयत्न सुरु आहे. माझ्यावर अनेक केसेस टाकण्यात आल्या. मी काही केसला घाबरत नाही. मला धमकीदेखील देऊन झाली. तुमच्यावर केस आहेत, तुम्हाल बघून घेऊ, असे मला धमकवाण्यात आले. हे बघण्याचे वगैरे दिवस गेले, असे आव्हाड म्हणाले. मी जे बोललोच नाही ते माझ्या तोंडी घातले. सिंधी लोकांना भडकवण्याचे काम केले, असे आव्हाडांनी सांगितले.

Exit mobile version