Uddhav Thackeray : “मुलांना सुट्ट्या, काही जण परदेशात”; ठाकरेंच्या दौऱ्यावर अजितदादांचा खोचक टोला

Uddhav Thackeray : “मुलांना सुट्ट्या, काही जण परदेशात”; ठाकरेंच्या दौऱ्यावर अजितदादांचा खोचक टोला

Ajit Pawar speak On Udhav Thackeay : महाविकास आघाडीतल्या काही नेत्यांच्या मुलांना सुट्ट्या आहेत, कोणी परदेशात आहेत, अशा खोचक टोला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं नाव घेता लगावला आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे काही दिवसांपासून कुटुंबियांसह परदेशात दौऱ्यावर आहेत. त्यावरुन अजित पवारांनी अप्रत्यक्षपणे खोचक टोला लगावला आहे. (Ncp Leader Ajit Pawar Speak On Udhav Thackeray)

संसद भवनाचा ‘तो’ फोटो पवारांना खटकला; जुन्या फोटोचा दाखला देत मोदी सरकारला फटकारलं

पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी वज्रमूठ सभेविषयी विचारलं असता, त्यांनी वज्रमूठ सभेच्या पुढील तारखा आम्ही महाविकास आघाडीमधील सर्व नेते एकत्र बसून चर्चा करुनच ठरवणार असल्याचं सांगितलं आहे.

Bal Shivaji: आकाश ठोसर साकारणार ‘बाल शिवाजी’, राज्याभिषेकाच्या ३५०व्या जयंती निमित्त सिनेमाचा फर्स्ट लूक प्रदर्शित 

यावर पुढे प्रतिप्रश्न केल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरेंचं नाव न घेता अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. ते म्हणाले, महाविकास आघाडीमधील काही राजकीय नेते लहान मुलांना सुट्ट्या असल्याने ते कुटुंबियांसमवेत बाहेरगावी गेले असल्याचं त्यांनी म्हटलंय.

राऊतांचा वेडसरपणा नीट करायचा उपाय आमच्याकडं; नारायण राणेंचा थेट इशारा

तसेच पुढे बोलताना त्यांनी पत्रकारांनाच थेट प्रतिप्रश्न करीत उन्हाळ्याच्या सुट्या असल्याने कुणी कुटुबियांनी घेऊन बाहेर जातं तर कोणी परदेशात जातंय. तुम्ही कुटुंबियांना घेऊन कुठं गेल नाहीत का? असा खोचक सवाल त्यांनी पत्रकारांना केला आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे परदेश दौऱ्यावर असताना महाराष्ट्रात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. सध्या महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरुन खडाजंगी सुरु असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवारांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. अशातच अजित पवारांनी अप्रत्यक्षपणे टीका केल्याने राजकारणात एकच चर्चा रंगत असल्याचं दिसून येत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube