Download App

जाहिरातीमागचं डोकं ठाण्याचं; आव्हाडांच्या हिंटने चर्चांना उधाण

  • Written By: Last Updated:

Jitendra Awhad On Eknath Shinde and Devendra Fadanvis :  राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेना व भाजपमध्ये सुरु असलेल्या जाहिरातबाजीवर भाष्य केले आहे. तसेच यावरुन फडणवीस नाराज असल्याचे देखील बोलले जात होते. पण आज दुपारी हे दोन्ही नेते एका कार्यक्रमाला हेलिकॉप्टरमधून एकत्र आले. त्यामुळे या दोघांवर आव्हाडांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसचे हा जाहिरातीचा कार्यक्रम ठरवून केल्याचेदेखील त्यांनी सांगितले.

एकाच हेलिकॉप्टरमधून निघाले आणि पालघरला वेगवेगळ्या गाड्यांमधून गेले. दोस्तीत मिठाचा खडा पडावा अशी आमची इच्छा नाही. मैत्री कायम राहावी , प्रेम कायम राहावं आपली हीच संस्कृती आहे. मात्र जे केलं ते कोणी केलं? मीठ टाकण्याच काम कोणी केलं? हे एका दिवसाच काम नाही जाहिरातीच प्लॅनिंग तीन चार दिवस आधीपासूनच होतं. त्यासाठी 2, 4 कोटी खर्च येतात ही संकल्पना कोणाची? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

‘एक दिल टुकडे हजार, कोई कहाँ गिरा’.. बावनकुळेंनी शायराना अंदाजात केलं महाविकासआघाडीचं भाकीत

तसेच आम्हाला त्यांच्या दोस्तीबद्दल बोलायचं नाही, पण यांच्यातील कोण नारदमुनि आहे? जो हे सगळं करत आहे. यांच्यातीलच कोणीतरी आहे, तो यांची दोस्ती तोडू पाहतोय. आम्हाला तर कधीच वाटत नाही यांची दोस्ती तुटावी. दोस्त दोस्त न राहा तो क्या प्यार प्यार न राहा…आम्ही बाजूला जाणार नाही ,आम्ही इथे जाणार नाही, जगाला तुम्ही बाजूला जावे असे मुळीच इच्छा नाही. मात्र , हा मिठाचा खडा टाकणारा कोण? हा कन्सल्टंट कोण ? ज्याने मैत्रीत नाही तर भाजप आणि शिंदे गटातच खडा पाडलेला आहे. आता तुम्ही लिंबू सरबत म्हणून तो पिऊ शकता. मात्र, जो बुंदसे गयी वो हौदसे नही आती, असा टोलादेखील त्यांनी लगावला.

जे केलं ते जाणूनबुजून केलेलं होत. ठाणे आणि कल्याणचा जो वाद सुरू झाला त्या वादातून हे करण्यात आलं असल्याचे आव्हाडांनी सांगितले. देवेंद्र फडणवीसांना किती टक्के आहेत, हे छापले नसते तर वाद झालेच नसते. या जाहिराती मागचं डोकं हे ठाण्याच याची मी तुम्हाला कल्पना दिली ते तुम्ही शोधून काढा, असा सूचक इशारा त्यांनी दिला.

काँग्रेस-भाजप-काँग्रेस-भाजप… आशिष देशमुखांचे वर्तुळ पूर्ण! आता तरी स्थिरावणार का?

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे सुपूत्र श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण- डोंबिवली या लोकसभेच्या जागेवरुन शिवसेना आणि भाजपमध्ये वाद सुरु होता. या जागेवर सध्या श्रीकांत शिंदे खासदार आहेत. पण भाजपने ही जागा लढवण्याचा आग्रह धरला आहे. त्यावरुन दोन्ही पक्षांमध्ये वाद सुरु आहे.

Tags

follow us