Download App

Jitendra Awhad म्हणाले, उद्धव ठाकरे यांचा ‘टोमणे’ मारायचा स्वभाव मला आवडतो

  • Written By: Last Updated:

ठाणे : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) हे ठाणे दौऱ्यावर होते. यावेळी शिवसेनेकडून आयोजिक आरोग्य शिबिराला त्यांनी भेट दिली. यावेळी उद्धव ठाकरेंबरोबर राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड (jitendra awad) हेदेखील होते. उद्धव ठाकरेंचा स्वभाव मला खूप आवडतो. उद्धव ठाकरेंविषयी मला आपुलकी आहे. सततच्या सहवासामुळे माणूस समजतो. त्या प्रेमापोटी मी त्यांच्या भेटीला गेलो होतो, असे विधान जितेंद्र आव्हाडांनी केले.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) होणार असं मला वाटते. पण ते वरिष्ठ नेते ठरवतील. प्रकाश आंबेडकर जे बोलले त्याविषयी स्पष्ट भूमिका घेतली आहे. सत्ता असो किंवा नसो, आम्ही शरद पवारांबद्दल (Sharad Pawar) काहीही देखील बोलले सहन करणार नाही. सत्ता ही फार महत्त्वाची आहे असे नाही. मानवी नाते मला महत्त्वाचं वाटतं. आमच्यात कोणत्याही प्रकारची राजकीय चर्चा झाली नाही.

पहिल्यापासून त्यांचा स्वभाव आवडतो. त्यांचे टोमणे मारणे, व्यंगात्मक बोलणे, एखाद्या वाक्यातून एखादा शब्द बाहेर काढणे. यामध्ये मज्जा येते. यामुळे त्यांची हुशारी दिसून येते. टोमणे मारणे सोप्पे काम नाही. टोमणे मारताना देखील त्यावेळेला कुठला टोमणा किंवा शब्द गेला पाहिजे हे लक्षात हवं. शब्दफेक ही कमालीची कला आहे असे जितेंद्र आव्हाडांनी यावेळी सांगितलं.

३५ वर्षात आयुष्यातील केवळ ३ वर्ष मी मंत्री होतो. ३२ वर्ष रस्त्यावरच गेली, यामुळे फरक काय पडतो. ‘ज्या बापाला आपण बाप मानलाय त्याबद्दल कुणी असे बोलले, तर मी विरोध करणार. एकटा असलो तरी विरोध करेन असं विधान जितेंद्र आव्हाडांनी प्रकाश आंबेडकरांच्या आरोपांवर केले आहे.

Tags

follow us