Download App

आव्हाडांनी टाळले पण, रोहित पवार बोललेच; नागालँडमधील भाजप मैत्रीवरून केले सूचक वक्तव्य

Rohit Pawar News : नागालँड विधानसभा (Nagaland Elections) निवडणुकीनंतर राज्यात एकमेकांचे राजकीय शत्रू म्हणून वावरत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि भाजपने (BJP) चक्क हातमिळवणी केली. या राज्यात राष्ट्रवादीने भाजपला समर्थन देण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादीच्या या निर्णयामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. विशेष करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची चांगलीच कोंडी झाली आहे. या मुद्द्यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना आमदारांच्या नाकीनऊ येत आहेत. आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Avhad) यांनी या प्रश्नावर उत्तर देण्याचेच टाळले तर दुसरीकडे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी मात्र सूचक वक्तव्य करत वेळ मारून नेली.

आ. पवार म्हणाले, की ‘मणिपूर या राज्यात भाजपने ज्या पक्षाविरोधात प्रचार केला. ज्या पक्षाच्या नेत्यांविरोधात प्रचार केला त्या नेत्यांबरोबरच जाऊन त्यांनी सरकार स्थापन केले असेल तर पहिला प्रश्न भाजपला विचारला पाहिजे असं कस झाले ?, काल नागालँडबद्दल पक्षप्रमुख खा. शरद पवार (Sharad Pawar) यांनी  स्पष्टीकरण दिले आहे त्यामुळे मी आधिक बोलून वेळ घेणार नाही.’

वाचा : दीड लाख रोजगारांचे गिफ्ट गुजरातला दिले, एफडीआयही घटला; रोहित पवारांनी बजेटआधी सरकारला घेरले

राजकीय समीकरणांबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले, की ‘पक्षप्रमुख शरद पवार (Sharad Pawar) काय करतील, कधी करतील त्यांच्या मनात काय आहे ? कधी मास्टस्ट्रोक खेळतील ? आणि कधी नवीन राजकीय समीकरण दाखवतील ? याचा अंदाज कुणालाच लागू शकत नाही. आणि तो लावण्याचा प्रयत्नीह कुणीसुद्धा करू नये.’

ते पुढे म्हणाले, की ‘नागालँडमधील निवडणुकीचा अभ्यास करण्यापेक्षा राज्यातील आगामी निवडणुकांमध्ये काय राजकीय समीकरण पुढे आणतील याच्यावर अभ्यास करण्याची गरज आहे. राष्ट्रवादी भाजपला सपोर्ट करते असे म्हणून चालणार नाही. पक्षप्रमुखांनी स्पष्टीकरण दिले त्यामुळे मी स्पष्टीकरण देण्याची गरज मला वाटत नाही. तिथे मुख्यमंत्र्यांना समर्थन दिले आहे, त्यामुळे भाजपला समर्थन दिले असे म्हणता येणार नाही.’

पुण्यात नाही चालले खोके, भाजपच्या तंत्राला पुणेकरांचे उत्तर; जितेंद्र आव्हडांचे खास स्टाइलने आभार

‘करोना काळात अनेक अडचणी असतानाही अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिस्त पाळून अर्थसंकल्प मांडला होता. जास्त कर्ज न घेता विकासकामे कुठेच थांबली नाही पाहिजेत याची दक्षता अजितदादांनी घेतली होती. भाजप सरकारच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात या राज्यावरील कर्ज कितीतरी पटीने वाढले होते, अशी टीका त्यांनी राज्य सरकारवर केली.

 

Tags

follow us