Download App

Rupali Thombre : शिरसाट हा विकृत माणूस, आम्हाला त्याचे…; ठोंबरेंचा हल्लाबोल

  • Written By: Last Updated:

Rupali Thombre Attack on Sanjay Sirasat :  राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते संजय शिरसाट यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. शिरसाट यांनी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंवर आक्षेपार्ह शब्दात टीका केली होती. यावरुन रुपाली पाटील ठोंबरे या चांगल्याच आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले आहे. त्यांनी सकाळी सोशल मीडियावर एक पत्र लिहीत शिरसाटांवर निशाणा साधला होता. आता पुन्हा एकदा त्यांनी शिरसाटांना लक्ष्य केले आहे.

आमदार संजय शिरसाट यांना भाऊ म्हणणार नाही. याचे कारण तेवढी त्यांची लायकी नाही. त्यांनी ठाकरे गटाच्या नेत्या, माझ्या मैत्रीण सुषमा अंधारे यांच्यावर ज्या शब्दात टीका केली त्याचा मी निषेध करते. राजकारणात काम करत असताना महिला समोरच्या पुरुषाला भाऊ, दादा असे म्हणत असतात. पण विकृत आमदार शिरसाट यांनी ज्या अश्लील व घाणेरड्या शब्दात वक्तव्य केले त्याचा मी जाहीर निषेध करते, अशा शब्दात ठोंबरेंनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

शिरसाटांविरुद्ध अंधारे मैदानात, अब्रु नुकसानीचा दावा ठोकणार !

आमदार असताना विरोधी पक्षातील महिलांवर असे वक्तव्य करणे व स्वत च्या पक्षातील महिलांवर असे वक्तव्य केल्यास गुन्हे दाखल करणे हे सर्व सत्तेच्या मस्तीमुळे सुरु असल्याची टीका ठोंबरेंनी केली आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षातील जे बेताल वक्तव्य करणारे आमदार आहेत त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिकवण द्यावी, असा टोला त्यांनी लगावला आहे.

निवडणुका कधीही होतील, तयार राहा ; जयंत पाटलांचे पदाधिकाऱ्यांना आदेश

तसेच आम्हाला शिरसाटांसारख्या विकृत  लोकांच्या घरातील पाणी पिणे देखील पाप आहे, असा घणाघात रुपाली ठोंबरे यांनी शिरसाटांवर केला आहे. दरम्यान, याप्रकरणाची सुषमा अंधारे यांनी महिला आयोगाकडे तक्रार दिली आहे.

Tags

follow us