Umesh Patil On Sanjay Raut : मुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदेंच्या नावाला संजय राऊतांचा विरोध होता आता ते धादांत खोट बोलत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील (Umesh Patil) यांनी केलायं. मुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) नावाला अजितदादा, दिलीप वळसे, सुनिल तटकरेंनी विरोध केल्याचं संजय राऊतांनी सांगितलं त्यावर बोलताना उमेश पाटलांनी संजय राऊतांवर गंभीर आरोप केलायं.
भाजपाचं ऑपरेशन झाडू, केजरीवालांनी सांगितले PM मोदींचे तीन प्लॅन; दिल्लीत हाय होल्टेज ड्रामा!
उमेश पाटील म्हणाले, मुख्यमंत्रीपदासाठी शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव हात वर करुन जाहीर केलं होतं, मात्र उद्धव ठाकरेंनी मला मुख्यमंत्री व्हायचं नाही असं सांगितलं होतं, आज एकनाथ शिंदेंच्या नावाला अजित पवार, सुनिल तटकरे, दिलीप वळसे यांनी विरोध केल्यानेच नाईलाजाने उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपद स्विकारावं लागलं असल्याची चुकीची माहिती संजय राऊत देत असल्याचा दावा उमेश पाटलांनी केलायं.
शाहरुख आणि करण जोहर समलैंगिक संबंध ठेवायचे, गायिकेने केला खळबळजनक दावा
तसेच राजकारणात सर्वच गोष्टी जाहीर केल्या जात नाहीत, परंतु वस्तुस्थिती अशी आहे की, संजय राऊत आणि त्यावेळेचे आमचे वरिष्ठ नेते यांच्यामध्ये मुख्यमंत्रिपदासाठी सुरुवातीच्या अडीच वर्षासाठी उद्धव ठाकरे आणि अडीच वर्षानंतर एक वेगळे नाव ठरलं होतं.
मुस्लिमांवरून फक्त प्रचार! वाचा, उमेदवारांची संख्या किती? अन् कोणत्या पक्षाने दिली संधी
उद्धव ठाकरेंनंतरच्या नावाबाबत गोपनियता बाळगण्यात आली होती. याबाबत पक्षातील अजितदादा, प्रफुल पटेल, सुनिल तटकरे या नेत्यांना माहिती दिली नव्हती. अडीच वर्षानंतर राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होणार होता. मात्र, अजितदादा ऐवजी तो कोण असणार? याची गोपनीयता ठेवण्यात आली होती. ते नाव फक्त आमचे त्यावेळचे वरिष्ठ नेते, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनाच माहिती होते, त्यामुळे संजय राऊत यांनी पुन्हा एकदा खुलासा करावा, अशी मागणी उमेश पाटील यांनी केलीयं.
दरम्यान, ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी मुख्यंमत्रिपदाबाबत मोठा दावा केला होता. एकनाथ शिंदेंच्या नावाला अजित पवार, सुनिल तटकरे यांनीच विरोध केला असल्यानेच उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्यात आलं होतं. त्यावर उमेश पाटलांनी आता संजय राऊत यांना पुन्हा एकदा याबाबत खुलासा करण्याची मागणी केलीयं. त्यावर संजय राऊत पुन्हा खुलासा करणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.