Download App

साडे अकरापर्यंत थांबा काय घडत ते पहा; राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडेंचे मोठं विधान

  • Written By: Last Updated:

गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात मोठ्या हालचाली सुरु आहे. राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा सध्या रंगू लागल्या आहेत. त्यात आता राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी साडे अकरापर्यंत थांबा आणि काय होतयं ते पहा असे विधान केले आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार का? या चर्चांनी जोर धरला आहे.

महत्वाची बाब म्हणजे राष्ट्रवादीच्या 53 पैकी 40 आमदारांनी आपल्या संमतीच्या स्वाक्षऱ्या अजित पवार यांच्याकडे दिल्या असल्याचे वृत्त द इंडियन एक्सप्रेसने दिले आहे. राष्ट्रवादीकडे सध्या स्थितीला 53 आमदार आहे. तर पक्षांतर बंदी कायद्याच्या नियमानुसार वेगळा गट स्थापन करण्यासाठी 36 आमदारांची गरज आहे. यामुळे महाविकास आघाडीला डावलत येत्या काळात अजित पवार हे भाजपसोबत दिसणार का असा प्रश्न राजकीय वर्तुळात निर्माण झाला आहे.

दादा जिथे आम्ही तिथे…राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदारांचा अजित पवारांना जाहीर पाठिंबा

तसेच अद्याप आम्हाला शरद पवारांकडून कोणताही फोन आला नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. थोड्याच वेळात विधीमंडळामध्ये मी अजितदादांना भेटणार आहे, असे बनसोडे यांनी एबीपी माझा या वृत्त वाहिनिशी बोलताना सांगितले. याचबरोबर राष्ट्रवादीचे आमदार माणिक कोकाटे व नितीन पवार यांनी देखील उघडपणे अजितदादा जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असले, असे सांगितले आहे.

दरम्यान, या सगळ्या प्रकरणावरुन अजित पवार यांनी काल एक फेसबूक पोस्ट लिहली होती. त्यामध्ये त्यांनी मी कोणतीही बैठक बोलावली नसल्याचे म्हटले आहे. खारघर (नवी मुंबई) येथे रविवारी झालेल्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळ्यावेळी झालेल्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या श्रीसदस्यांच्या कुटुंबियांना आणि उष्माघातामुळे बाधित झालेल्या श्रीसदस्यांना भेट देऊन त्यांना धीर देण्यासाठी मी ‘एमजीएम’ हॉस्पिटलमध्ये सोमवारी पहाटेपर्यंत उपस्थित होतो.

मोठी बातमी : बंडासाठी अजित पवारांकडे 40 आमदारांच्या सह्यांचे पत्र तयार?

सोमवारी माझा कोणताही नियोजित कार्यक्रम नव्हता. मी मुंबईतच आहे. उद्या, मंगळवार दि. १८ एप्रिल २०२३ रोजी मी विधानभवनातील माझ्या कार्यालयात उपस्थित राहणार असून कार्यालयाचे नियमित कामकाज सुरु राहणार आहे. मंगळवारी मी आमदारांची बैठक बोलावल्याच्या बातम्या काही माध्यमातून प्रसिद्ध होत आहेत, त्या पूर्णत: असत्य आहेत. मी आमदार अथवा पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली नाही, याची नोंद घ्यावी, असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. पण या सगळ्या घटनांमुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या आहेत.

Ajit Pawar : कुठलाही भूकंप सांगून येत नाही, बंडावर अशोक चव्हाणांचं सूचक वक्तव्य

 

Tags

follow us