Download App

Jitendra Awhad : शरद पवार-उद्धव ठाकरे भेटीत चर्चा काय? आव्हाडांनी स्पष्टच सांगितलं

Jitendra Awhad : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची काल सिल्व्हर ओक येथे भेट झाली. या दोन्ही नेत्यांच्या भेटीची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या भेटीत काय चर्चा झाली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी काल मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. दोन्ही नेत्यांच्या भेटीत राजकीय मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती आव्हाड यांनी दिली.

या बैठकीला काँग्रेसचा एकही नेता उपस्थित नव्हता. यावर आव्हाड म्हणाले, ही भेट व्यक्तिगत पातळीवर होती. त्यामुळे काँग्रेसचा नेता येण्याचा प्रश्न येत नाही. राज्यात दिवाळीनंतर दसरा मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. या मेळाव्यावर बोलताना आव्हाड म्हणाले, मी ओबीसी आहे. मी कधीही लपवलेलं नाही. पण मी यामुळे मराठा आरक्षणाला विरोध करेल का. तर करणार नाही. मराठा समाजाची परिस्थिती घसरत चालली आहे. त्यांना सावरण्याची गरज आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, असेही आव्हाड यांनी स्पष्ट केले.

Jitendra Awhad : बाबासाहेब पुरंदरेंना विरोध केला तेव्हा तटकरेंनी मला दम भरला होता; आव्हाडांचे तटकरेंवर गंभीर आरोप

सुनील तटकरेंनी मला दम दिला 

बाबासाहेब पुरंदरे यांनी कुणब्यांविषयी आपल्या पुस्तकात वाईट पद्धतीनं लिहिलं होतं. तेव्हा आपण पुरंदरेंना विरोध केला होता, त्यावेळी खासदार सुनील तटकरेंनी विरोध करत दम दिला होता. बाबासाहेब पुरंदरेंनी मराठा-कुणब्यांविषयी वाईट पद्धतीनं लिहिलं होतं. तेव्हा आपण विरोध केला, तुमच्याकडून विरोध तर झालाच नाही पण उलट मला माझं वक्तव्य मागं घेण्यासाठी दमबाजी केली. शरद पवार यांच्याशी मी या विषयावर बोललो त्यावेळी त्यांनी सांगितलं की, तुझं वक्तव्य मागं घेतलंच पाहिजे असं नाही असे शरद पवार म्हणाल्याचे आव्हाड यांनी सांगितले.

मराठ्यांच्या विरोधातील इतिहास चुकीचा लिहिला होता. त्याला मी विरोध केला, त्यावेळी खासदार सुनील तटकरेंनी मला दम देऊन बोलू नको असं सांगितलं होतं. असं असलं तरी शरद पवार यांनी मला सांगितलं की, मी तुझ्या पाठिशी आहे, तुला जे काही बोलायचं ते बोल असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं असेही आव्हाड यांनी काल प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले होते.

Jitendra Awhad : करारा जवाब मिलेगा..! ‘त्या’ वक्तव्यावर आव्हाडांचा बावनकुळेंना इशारा

Tags

follow us