Download App

NCP : राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदारावर गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण ?

बीड : भाजपा कार्यकर्ते अशोक शेजुळ यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. यामुळे बीड शहरात राजकीय वातावरण चिघळले होते. आता या प्रकरणी महत्वाची माहिती समोर आलीय. पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांच्यासह त्यांच्या पत्नीवर गुन्हा दाखल केला. याप्रकरणी अशोक शेजुळ यांनी पोलिसांत त्यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली.

या फिर्यादीनुसार आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके (Prakash Solanke), आणि त्यांच्या पत्नी मंगला सोळंके आणि उद्योजक रामेश्वर टवाणी यांच्यासह ४ ते ५ जणांविरोधात माजलगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. भाजपा कार्यकर्ते अशोक शेजुळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या अनेक संस्थांमधील अनियमिततेविषयी तक्रारी केल्या होत्या. या कारणामुळे शेजुळ यांच्यावर हल्ला करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला.

https://www.youtube.com/watch?v=vev7UU9ANZA

नेमकं काय आहे प्रकरण ?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपा कार्यकर्ते अशोक शेजुळ यांनी सुंदरराव सोळंके टेक्सटाईल पार्क, माजलगाव सहकारी साखर कारखान्याची माहिती अधिकाराअंतर्गत माहिती मागवण्यात आली होती. यामुळे त्यांनी संभाजीनगर हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली. दरम्यान, मंगळवारी धुलिवंदनाच्या दिवशी शेजुळ यांच्यावर अज्ञात ४ ते ५ जणांनी हल्ला केला.

Sanjay Raut ‘त्या’ वक्तव्यावर ठाम, ‘माझे विधान एका विशिष्ट गटापुरते मर्यादित’

त्यांना तू लय प्रकाश सोळंकेंच्या तक्रारी करतो का ? असे म्हणत लोखंडी रॉडने त्यांना मारहाण करत गंभीर जखमी केल्याचे फिर्यादीमध्ये त्यांनी सांगितल आहे. या हल्ल्यामध्ये शेजुळ यांच्या दोन्ही पायांना, दोन्ही हातांना आणि कंबरेत दुखापत झाली. याप्रकरणी शेजुळ यांच्या फिर्यादीवरून आमदार प्रकाश सोळंके, त्यांच्या पत्नी मंगला सोळंके, टेक्स्टाईल पार्कचे अध्यक्ष रामेश्वर टवाणी यांच्यासह ५ ते ६ जणांविरुद्ध माजलगाव शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांनी दिली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Tags

follow us