Download App

अजितदादा अन् शिंदेंना भाजपने का जवळ केलं? रोहित पवारांच्या उत्तरात दडलाय भाजपचा प्लॅन

Rohit Pawar : देशात 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election) राज्यात जोरदार तयारी सुरू झाली आहे. सत्ताधारी भाजपने (BJP) आपला 45+ अजेंडा सेट केला आहे. यासाठी मित्रपक्षांना सोबत घेण्याचाही प्लॅन केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांना सोब घेऊन जास्त जागा जिंकण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीकडूनही तयारी सुरू झाली आहे. भाजपाच्या राजकारणाच्या पद्धतीवर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पुन्हा एकदा तोफ डागली आहे. तसेच भाजपने एकनाथ शिंदे आणि अजितदादांना सोबत का घेतले, याचे उत्तरही देऊन टाकले.

Radhakrishn Vikhe : संजय राऊत सर्वात मोठा दलाल; मंत्री विखेंची कडव्या शब्दांत टीका

पवार म्हणाले, एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीतील काही नेत्यांना भाजपने फक्त लोकसभेसाठी जवळ केलं आहे. पण, लोकांच्या मनात भाजपविरोधी वातावरण आहे. भाजप फक्त लोकसभा निवडणुकांचा विचार करत आहे. एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीच्या काही नेत्यांना भाजपने फक्त लोकसभेसाठी जवळ केलं आहे. पण, लोकांच्या मनाचा कौल घेतला तर वातावरण भाजपाच्या विरोधात आहे. भाजपाबरोबर गेलेल्या लोकांनी कुठेच जनमत राहिलेलं नाही.

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी अजितदादांवर केलेल्या जहरी टीकेवरही आ. पवार यांनी पुन्हा एकदा भाष्य केले. यावेळी त्यांनी भाजप नेत्यांवर आरोप केले. ते म्हणाले, भाजपाचे मोठे नेते जाणूनबुजून या लहान नेत्यांना पुढे करतात आणि त्यांना या नेत्यांविरोधात बोलायला सांगतात. शरद पवार यांच्याबद्दल बोलले, आम्ही समजू शकतो. पण, अजित पवारांना बरोबर घेऊन त्यांच्याविरोधात बोलतात. हेच भाजपाचं राजकारण आहे.

सामंतांच्या भावाला तिकीट मिळालं तर मी स्वतः प्रचार करील; कदमांचं क्लिअर पॉलिटिक्स !

अजित पवार गटाकडून आमदारांना ब्लॅकमेल करण्याचा प्रकार

दरम्यान, आता आणखी एका खासदाराने अजित पवार यांना पाठिंबा दिल्याची माहिती समोर येत आहे. यावरून त्यांनी अजित पवार गटावर निशाणा साधला आहे. काही नेत्यांन ब्लॅकमेल केले जात आहे. सही कर नाही तर अमुक अमुक काम होणार नाही अशी धमकीही दिली जात आहे. एक खासदार आणि एक आमदार खरंच अजित पवार गटात गेला का हे पहावं लागणार आहे. आमदारांचे एखादे महत्वाचे काम त्याने प्रतिज्ञापत्र दिल्याशिवाय केले जात नाही, असा आरोप रोहित पवार यांनी केला.

Tags

follow us