Download App

राष्ट्रवादीचे आमदार म्हणतात, “Sudhir Mungantiwar यांच्या मंत्रामुळेच आमदार!” भाजप प्रवेशाच्या चर्चा

  • Written By: Last Updated:

पुणे : “सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी दिलेल्या मंत्रामुळेच मी आमदार झालो” असे जाहीर वक्तव्य राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) मावळमधील आमदार सुनील शेळके यांनी केले. त्यामुळे मावळमध्ये पुन्हा सुनील शेळके (Sunil Shelke) यांच्या पक्षबदलाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. मावळ येथील एका वृक्षारोपण कार्यक्रमात आमदार शेळके बोलत होते.

तर याच कार्यक्रमात बोलताना, “मावळचे आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) हे पूर्वाश्रमीचे भाजपाचेच होते. मात्र तिकीट न मिळाल्याने ते राष्ट्रवादीत गेले. राजकारणात मनापासून काम केल्यास संधी मिळते.” असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवर या कार्यक्रमात म्हणाले. त्यामुळे सुनील शेळके यांच्या भाजपच्या वाढत्या जवळकीची चर्चा सुरु झाली आहे. सुनील शेळके मावळ मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार आहेत. सुनील शेळके विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्येच होते पण निवणुकीत तिकीट न मिळाल्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आणि ते निवडून आले

आज सुनील शेळके हे अजित पवार यांचे समर्थक मानले जातात पण या कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, “सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी ‘कोशिश करने वालो की कभी हार नही होती’ असा मंत्र आपल्याला दिला.” त्यामुळे मला आमदार व्हायचेच होते. त्यांच्या या मंत्रामुळे मी आमदार झालो.

माजी आमदारांच्या अनुपस्थितीची चर्चा

राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून आमदार झालेल्या सुनील शेळके यांनी आपल्या भाजपमधील जुन्या सहकाऱ्यांसोबत पुन्हा सलोखा वाढविण्यास सुरुवात केली असल्याचे आजच्या कार्यक्रमातून दिसून आले. पण या कार्यक्रमाला राज्याचे मंत्री आणि वरिष्ठ भाजप नेते सुधीर मुनगंटीवार उपस्थित असतानाही स्थानिक भाजप नेते बाळा भेगडे यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरत आहे.

Tags

follow us