Download App

Amol Kolhe : अजितदादा आजकाल कुणाची स्क्रिप्ट वाचतात? अमोल कोल्हेंचा थेट सवाल

Image Credit: Letsupp

Amol Kolhe Criticized Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्यातील शाब्दिक यु्द्ध जोरात सुरू आहे. आजपासून अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात शेतकरी आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली. सुरुवातीलाच अमोल कोल्हे यांनी थेट अजितदादांना निशाण्यावर घेत आपले इरादे स्पष्ट केले. अजितदादा स्वतःच्या गावासह मतदारसंघातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू शकले नाहीत. त्यांच्या आव्हानाचे माझ्यावर दडपण नाही. अजित पवार हे आजकाल कुणाची स्क्रिप्ट वाचत आहेत? असा सवाल अमोल कोल्हे यांनी केला. किल्ले शिवनेरी येथून आज शेतकरी आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली. या मोर्चात शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

Amol Kolhe : शेतकरी अन् कांदा निर्यातबंदीवर जाब विचारला म्हणून निलंबन; कोल्हेंनी सांगितली वेगळी स्टोरी

कोल्हे पुढे म्हणाले, अजित पवार मोठे नेते आहेत त्यामुळे त्यांच्याविषयी मी जास्त बोलणार नाही. सध्या अशी परिस्थिती आहे की उद्योजकांचं 25 लाख कोटींचंही कर्ज माफ होतं पण शेतकऱ्यांचं कर्ज माफ होत नाही. यामुळे जर शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागत असेल तर सरकारला लाज वाटायला हवी. आम्ही संसदेत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला जाब विचारला तर आम्हाला निलंबित करण्यात आलं. मात्र ही चर्चा जर सरकारला गदारोळ वाटत असेल तर आता या मोर्चाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवणार असल्याचे कोल्हे म्हणाले.

शेतकरी आक्रोश मोर्चा कशासाठी ? 

शेतकरी आक्रोश मोर्चा उद्यापासून सुरू होणार आहे. सहा महत्वाचे मुद्दे घेऊन या मोर्चाला सुरुवात होणार आहे. त्यात कांदा निर्यातबंदीचा मुद्दा महत्वाचा आहे. कांद्यावरील निर्यातबंदी तत्काळ उठवावी तसेच कांद्यासाठी एक धोरण निश्चित करावं. बिबट्यांचा वावर असलेल्या भागात अखंड वीजपुरवठा करावा. पीक विमा योजनेत कंपन्यांचाच फायदा होत आहे. शेतकऱ्यांना काहीच नुकसानभरपाई मिळत नाही. तेव्हा याबाबतीतही धोरण निश्चित करावं.

Amol Kolhe : ‘बात निकली है तो दूर तक जाएगी’ कोल्हेंनीही अजितदादांना घेरलंच

मागील सहा महिन्यांच्या काळात दुधाचे दर लिटरमागे दहा ते बारा रुपयांनी कमी झाले आहेत. राज्य सरकारने फक्त शासकीय दूध संस्थांना लिटरमागे पाच रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे. तसे न करता सरसकट अनुदान जाहीर करावे ही मागणी आहे. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी तसेच शेतकऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक कर्ज घेतेवेळी अनेक जाचक अटींचा सामना करावा लागतो यासंदर्भातही धोरण निश्चित करावं. या सगळ्या मागण्या घेऊन शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.

follow us

वेब स्टोरीज