Download App

‘शिवनेरीवर भगवा ध्वज लावण्याला आपला विरोध…? अमोल कोल्हेंचा भाजपला सवाल

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजाचं (Chhatrapati Shivaji Maharaj) जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर शासकीय शिवजयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा आपण बहिष्कार करत असल्याचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी नुकतंच जाहीर केलं आहे. केशव उपाध्ये (Keshav Upadhye ) यांनी दिशाभूल करू नये.. शिवनेरी वर भगवा ध्वज लावण्याला आपला विरोध आहे का ? कुणाच्या शिवभक्ती विषयी शंका घेण्याइतके आपले योगदान आहे का ? राजकारण आणू नका… शिवनेरीवर भगवा लागावा यासाठी प्रयत्न करा!, असा सवाल राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी भाजपला केला.

नेमकं काय म्हणाले…
किल्ले शिवनेरी वर भगवा ध्वज लागावा यासाठी, शिवजयंतीच्या केवळ शासकीय कामावर भविष्कार टाकण्याची घोषणा जी केली, भगवं जाणीव आंदोलन करण्याचा जो मनोदय जाहीर केला, त्यानंतर भाजपच्या प्रवक्ते केशव उपाध्ये त्यावर प्रतिक्रिया त्यांनी दिली, त्यावर राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी सवाल केला आहे, मी पहिल्यांद्याच स्पष्ट केलं आहे की, यात कोणाचाही विरोध नाही, केवळ शिवभक्त्यांच्या भावना आहेत, या गोष्टीत राजकारण आण्याची गरज काय ? दुसरी गोष्ट म्हणजे मला कोणताही प्रश्न विचारण्याआधी, आपल्या मंत्री महोदयांना याची विचारणा करावी. शिवनेरी वर भगवा ध्वज लागावा, याची २०२१ पासून किती पत्र आणि किती निवेदन व किती भेटी आणि किती बैठका यासाठी मी माननीय मंत्री महोदयांची कितीवेळा भेट घेतली, हा प्रश्न विचारावं.

संसदेच्या कामकाजामध्ये किती वेळा हा मुद्दा मी उपस्थित केला आहे, याची आपण माहिती घ्यावी, आणि यानंतर आपण शिवभक्ती विषयी जे प्रश्तीपत्रक जे वाटत आहेत, तर केशव उपाध्ये आपलं एकूण शिवकार्य विषयी असलेले योगदान लक्षात घेता, जो काही माझा आतापर्यंतचा खारीचा वाट असेल, त्या शिव कार्याला आपल्या पत्रकाची आवश्यकता नाही, कृपया याची नोंद घ्यावी, यामध्ये राजकारण आणू नये, जर तुम्हाला वाटत नसेल तर किल्ले शिवनेरी वर भगवा ध्वज लागावा तर विरोध करावा,  थेट रोकडा स्वभाव शिव भक्ताचा आहे.

माझ्या राज्याच्या जन्म स्थळावर शिवनेरी वर भगवा ध्वज लागला पाहिजे, निवडून आल्यापासून पहिले २ वर्ष कोविडमध्ये गेले, आणि गेल्या वर्षी आवर्जून उल्लेख करतो, कारण पुढे तुम्ही कुठे जाऊन लपणार आहोत, आणि गेल्यावर्षी का नाही केलं,  तर गेल्या वर्षी बंगळूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना झाल्यावर आपण मूक घेऊन गप्प बसले असताना, मी बंगळूरमध्ये जाऊन त्या महाराजांच्या पुतळ्याचं दुग्ध अभिषेक केला आहे,  गेल्या शिव जयंतीला तेव्हापासून म्हणजे २०२१ पासून ही मागणी आहे, तीच मागणी पुढे करतोय, यामध्ये कोणतंही राजकारण नाही, कोणतेही पक्षीय राजकारण नाही, सरसकट शिव भक्तांची, शिव शंभू भक्तांची  भावना आहे, याला राजकारणाचा रंग देऊन, शिव भक्तांच्या भावनाचा अवमान करू नये, ही माझी विनंती आहे, असे यावेळी अमोल कोल्हे यांनी भाजपाला सुनावलं.

Tags

follow us