Supriya Sule : 85 विकासकामं सांगितली, पण 4 चं केली…सुप्रियाताई उरलेला ‘विकास’ कधी करणार?

शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या एकूण विकासकामांच्या निधीपैकी फक्त 6.9 टक्केच निधी त्यांनी खर्च केलेला आहे.

Supriya Sule

Supriya Sule

Supriya Sule MP Fund : ठाकरे गटाच्या सहा खासदारांनी निधी मिळत नसल्याची बोंब मारत शिवसेनेत प्रवेश केलायं. विरोधी बाकावर बसून निधी मिळत नसल्याने सहा खासदारांनी ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश केलायं. त्यामुळे खरंच विरोधी खासदारांना निधी मिळत नाही का? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडलायं. लेट्सअप मराठीने विरोधी खासदारांना मिळालेला एकूण निधी किती? खर्च केलेला निधी आणि केलेल्या विकासकामांचा आढावा घेण्याचा प्रयत्न केलायं. विरोधी खासदारांमध्ये नेहमीच चर्चेत असलेल्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेदेखील (Supriya Sule) सत्ताधारी सरकारविरोधात निधीवरुन टीका करताना दिसून आल्या आहेत. परंतू सुप्रिया सुळे यांना मागील तीन वर्षांत एकूण निधी मिळालायं किती? त्यांनी खर्च केला किती? याची संपूर्ण माहिती आपण समजून घेऊयात…

Supriya Sule

राजकारणात शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महत्वाचा मानला जातो. पक्षाचा प्रमुख चेहरा म्हणून सुप्रिया सुळे यांच्याकडे पाहिलं जातं. 2024 च्या बारामती लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी सध्याच्या उपमुख्यमंत्री असलेल्या दिवंगत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना पराभवाची धूळ चारत पुन्हा खासदार बनल्या आहेत. त्यामुळे आता बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळेंनी किती निधी खर्च केलायं, कोणती विकासकामे केलीत? हे सविस्तर पाहुयात..

2024 ची लोकसभा निवडणूक लागली. त्याआधी दिवंगत अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील बहुतांश आमदार सोबत घेत सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आगामी लोकसभा महायुतीचा घटक पक्ष म्हणून अजित पवार गट निवडणुकीच्या रिंगणात उतरला होता. अशातच बारामती लोकसभा मतदारसंघात उत्सुकता होती ती सुप्रिया सुळेंच्या विरोधात कोण उमेदवार असणार? त्याच उत्तर सुनेत्रा पवार यांच्या रुपात मिळालं. महायुतीचे उमेदवार सुनेत्रा पवार आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्यात लढत होती. बारामतीच्या इतिहासात पहिल्यांदाच पवार कुटुंबियांमध्ये होत असलेली लढत अतिशय प्रतिष्ठेची मानली गेली. एकीकडे विकासकामांनी बारामतीचा कायापालट करणारे अजितदादा तर दुसरीकडे भावनिक नाळ जुळलेले शरद पवार. या निवडणुकीत बारामतीकरांनी शरद पवार यांनाच कौल देत सुप्रिया सुळे यांना तब्बल 1 लाख आठ हजार 490 चा लीडने विजय मिळवून दिला.

Maharashtra Rain Update : महाराष्ट्र पावसाने भिजला! 29 जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अलर्ट जारी…

खासदार सुप्रिया सुळे यांनी मतदारसंघातील 85 विविध विकासकामांची शिफारस केली होती. या 85 विकासकामांपैकी अवघे 4 चं काम पूर्ण झाली असून एकूण विकासकामांपैकी 4.7 टक्केच कामे सुळे यांनी मागील तीन वर्षांत पूर्ण केलेली आहेत. सुळे यांना तीन वर्षांत एकूण 14.7 कोटी रुपयांची निधी मंजूर झालेला असून त्यापैकी फक्त 1 कोटींची विकासकामे त्यांनी केलेली आहेत. एकूण निधीपैकी फक्त 6.9 टक्केच निधी त्यांनी खर्च केलेला आहे.

आता हा झाला खासदार सुळेंच्या विकासकामांचा आढावा पण खासदारांना नेमका निधी मिळतो तरी किती आणि तो कसा खर्च केला जातो. याबाबत समजून घेऊ. कुठल्याही खासदाराला खासदार स्थानिक विकास क्षेत्र योजनेंतर्गत निधी दिला जात असतो. प्रत्येक खासदाराला एका वर्षासाठी 5 कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकारकडून दिला जातो. विशेष म्हणजे केंद्र सरकाकडून देण्यात येणार निधी हा सत्ताधारी असो वा विरोधक दोन्ही बाजूच्या खासदारांना दिला जातो.

खासदारांना मिळत असलेला निधी थेट खासदाराच्या हातात दिला जात नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून खर्च केला जात असतो. मतदासंघाचा खासदार विकासकामांची शिफारत करतात, त्यानंतर जिल्हाधिकारी विकासकामांची तपासणी करुन मंजुरी देत असतात. उदाहरणार्थ रस्ते, सामाजिक सभागृहे, पूल, क्रीडा सुविधा, सौरऊर्जा यांसह इतर पायाभूत सुविधांसाठी हा निधी असतो. त्यानूसार जो तो विभाग किंवा स्थानिक स्वराज्य संस्था विकासकामे पूर्ण करतात तर त्याचा संपूर्ण हिशोब प्रशासनाकडे ठेवला जातो.

एकेकाळी आपला वरचष्मा कायम ठेवणऱ्या काँग्रेसची अवस्था कठीण; विधान परिषदेतून मराठवाड्यात एकही आमदार नाही

दरम्यान, अनेकांना असं वाटत असेल की जर खासदारांनी हा निधी खर्चच केला नाही तर तो मागे जात असेल परंतू एकदा निधी मंजूर झाल्यानंतर हा निधी खासदारकीच्या पूर्ण पाच वर्षांत कधीही खर्च करता येतो. अनेक खासदार पुढील निवडणूक जवळ आली की मग विकासकामांचा धडाका सुरु करत असतात, याचं कारण म्हणजे मतदारांना केलेली कामे लक्षात रहावी आणि मतदारांनी आपल्या पारड्यात मतदान टाकावे हा यामागचा उद्देश असतो.

Exit mobile version