Download App

NCP News : राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह कुणाचं? शरद पवार की अजितदादांचं? आज महत्वाची सुनावणी

NCP News : राष्ट्रवादी काँग्रेस (NCP News) पक्ष आणि चिन्हाचा वाद निवडणूक आयोगाच्या कोर्टात आहे. आता या प्रकरणात आज दुपारी निवडणूक आयोगात महत्वाची सुनावणी होणार आहे. या सुनावणीत राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह कुणाचे यावर निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजच्या या सुनावणीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. सुनावणी असल्याने दोन्ही गटांनी जोरदार तयारी केली आहे. शरद पवार गटाने जवळपास नऊ हजार पानांचे शपथपत्र दाखल केल्याची माहिती आहे.

अजित पवार (Ajit Pawar) यांनी जुलै महिन्यात राष्ट्रवादीतील मोठा गट सोबत घेत बंडखोरी केली. त्यानंतर ते शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. त्यांच्यासह काही आमदारांना मंत्रिपदेही मिळाली. आता अजित पवार गटाबरोबर नेमके किती आमदार आहेत याचा अजून खुलासा झालेला नाही. तरी देखील या गटाने थेट पक्ष आणि चिन्हावरच दावा ठोकला. यासाठी त्यांनी थेट निवडणूक आयोगात धाव घेतली होती. याच प्रकरणात आज निवडणूक आयोगात सुनावणी होणार आहे. सुनावणी होऊन आयोग या प्रकरणात निर्णय देईल अशी शक्यता आहे. तसेच ही सुनावणी कदाचित पुढे लांबण्याचीही शक्यता नाकारता येत नाही असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

Sanjay Raut : ‘कुणीही ऐरागैरा उभा राहतो आणि सांगतो’.. राऊतांचा अजितदादांना टोला

शरद पवार गटाच्या हालचाली 

शरद पवार (Sharad Pawar) गटानेही हालचालींना वेग दिला आहे. या गटाने जवळपास नऊ हजार पानांचे शपथपत्र दाखल केल्याचे सांगण्यात येत आहे. शरद पवार गटातील नेतेही आयोगाचा निकाल आमच्याच बाजूने लागेल असा दावा करत आहेत. तर दुसरीकडे शरद पवार गटाच्या कार्यसमितीची तातडीची बैठक नवी दिल्लीत पार पडली. निवडणूक आयोगाने जर पक्षचिन्ह गोठवलं तर पुढे काय रणनीती असेल यावर या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे.

शरद पवार गटाकडून यांच्या गटाकडून ज्येष्ठ विधीज्ञ अभिषेक मनू सिंघवी युक्तिवाद करणार आहेत. या प्रकरणात ही पहिलीच सुनावणी असेल त्यामुळे दोन्ही गटांकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. या सुनावणीसाठी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी उपस्थित राहण्याची गरज नाही. तरी देखील पक्षातील दुसऱ्या फळीतील नेते उपस्थित राहतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या प्रकरणी आता दोन्ही गटांकडून काय युक्तिवाद केला जातो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

‘गुवाहाटीत टेबलवर नाचायला पैसे पण, औषधांसाठी नाही’; नांदेड मृत्यूप्रकरणी उद्धव ठाकरे संतापले

 

Tags

follow us