Download App

NCP Party Symbol Case : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा ? ‘या’ महिन्यात होणार सुनावणी

NCP Party Symbol Case : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जुलै 2023 फूट पडल्यानंतर आता आता राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन पक्ष तयार झाले आहे.

NCP Party Symbol Case : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) जुलै 2023 फूट पडल्यानंतर आता आता राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन पक्ष तयार झाले आहे. एक अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष  तर दुसरा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष (NCP Sharad Chandra Pawar Party). या प्रकरणात निवडणुक आयोगाने (Election Commission) मोठा निर्णय घेत राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला दिले होते.

तर शरद पवार यांना तुतारी वाजविणारा माणूस हा चिन्ह देण्यात आला होता. मात्र निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) याचिका दाखल केली आहे. या प्रकरणात आज सुनावणी देखील होणार होती मात्र सर्वोच्च न्यायालयात सुरु असणाऱ्या कामकाजामुळे आणि उन्हाळी सुट्ट्यांमुळे या याचिकेवर सुनावणी होऊ शकली नाही. यामुळे आता या प्रकरणात दोन महिन्यानंतर सुनावणी होणार आहे.

जुलै 2023 मध्ये सर्वांना धक्का देत अजित पवार भाजप – शिवसेनासह सत्तेत सहभागी झाले होते. त्यानंतर राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह कोणाचा? या प्रकरणात निवडणूक आयोगाने सुनावणी करत राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला दिले होते.

हा निर्णय मान्य नसल्याने शरद पवार गटाने या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर आज न्यायमूर्ती सुर्यकांत आणि न्यायमूर्ती के.व्ही.विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार होती. मात्र आज सर्वोच्च न्यायालयात सुरु असणाऱ्या कामकाजामुळे ही सुनावणी झाली नाही.

तर आता सर्वोच्च न्यायालयाला उन्हाळी सुट्ट्या सुरू होणार आहेत. यामुळे या प्रकरणात जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी होणार आहे. राष्ट्रावादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह निवडणूक आयोगाने एकतर्फी पद्धतीने अजित पवार यांना दिले असे शरद पवार गटाने दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे.

सध्या देशात लोकसभा निवडणूक सुरु असून अजित पवार गट घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढवत आहे तर शरद पवार गट तुतारी वाजविणारा माणूस या चिन्हवर निवडणूक लढवत आहे.

अमित शाहांचा मोठा दावा! म्हणाले, भाजप 270 प्लस जाणार

काही दिवसापूर्वी अजित पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्ह असलेले घड्याळ तसेच पक्षाचे नाव काही अटी घालून वापरण्याची परवानगी न्यायालयाने दिली आहे.

follow us