‘नाही तर त्यांच्या मतदरासंघात जाऊन उत्तर देणार’; भुजबळांचा रोहित पवारांवर निशाणा

NCP Politicla Crisis :  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी रोहित पवारांवर जोरदार निशाणा साधला आहे. मी त्यांना किंमत देत नसल्याचे टोला भुजबळांनी रोहित पवारांना लगावला आहे. अजित पवारांच्या भाजपसोबत जाण्याच्या निर्णयानंतर शरद पवारांनी महारष्ट्रभर दौरा करायला सुरुवात केली आहे. त्यांची पहिली सभा छगन भुजबळांच्या येवला मतदारसंघात झाली होती. यावेळी रोहित पवारही त्यांच्या बरोबर होते. […]

Letsupp Image   2023 07 10T130046.376

Letsupp Image 2023 07 10T130046.376

NCP Politicla Crisis :  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी रोहित पवारांवर जोरदार निशाणा साधला आहे. मी त्यांना किंमत देत नसल्याचे टोला भुजबळांनी रोहित पवारांना लगावला आहे. अजित पवारांच्या भाजपसोबत जाण्याच्या निर्णयानंतर शरद पवारांनी महारष्ट्रभर दौरा करायला सुरुवात केली आहे. त्यांची पहिली सभा छगन भुजबळांच्या येवला मतदारसंघात झाली होती. यावेळी रोहित पवारही त्यांच्या बरोबर होते. रोहित पवारांनी भुजबळांविषयी साहेबांनी काय कमी केलं अशी एक पोस्ट केली होती. त्यावर भुजबळांनी आता रोहित पवारांवर निशाणा साधला आहे.  ( Chhagan Bhujbal attack on Rohit Pawar )

NCP Political Crisis: राष्ट्रवादी खरी कोणाची? शरद पवार की, अजित पवार ‘या’ फॉर्म्युल्यावर निवडणूक आयोग देणार निर्णय

भुजबळ म्हणाले की, मी 1985 मध्ये महापौर आणि आमदार झालो, त्यानंतर चार महिन्यांनी रोहित पवारांचा जन्म झाला. त्यामुळं मला मोठं केलं, मोठं केलं अशा फालतू गोष्टी करू नका, इतिहास जाणून घ्या, असे म्हणत भुजबळांनी रोहित पवारांना सुनावले. अजित पवार आणि तुम्ही पवार घराणे यांनी ठरवून साहेबांचा राजीनामा घ्यायचं ठरवलं, आम्हाला सांगितलं होतं का? मी त्यांना जास्त किंमत देत नाही. ते जेवढे पुढे येतील तेवढ्या लवकर त्यांना त्यांच्या मतदारसंघात जाऊन उत्तर देईल, असे भुजबळांनी रोहित पवारांना ठणकावले.

NCP Political Crisis: राष्ट्रवादी खरी कोणाची? शरद पवार की, अजित पवार ‘या’ फॉर्म्युल्यावर निवडणूक आयोग देणार निर्णय

यावेळी त्यांनी अजित पवारांची येवल्यामध्ये उत्तर सभा होणार असल्याचेही सांगितले. लवकरच अजितदादांची सभा होईल असे ते म्हणाले. दरम्यान, अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवारांनी महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केली आहे. त्यांची पहिली सभा छगन भुजबळांचा मतदारसंघ येवला येथे झाली. यावेळी माझी चूक झाली मला माफ करा असे म्हणत पवारांनी भुजबळांना सुनावले होते.

Exit mobile version