Download App

तुम्ही सर्व परत या, मी अन् जयंतराव बाहेर पडतो; आव्हाडांची अजितदादांना भावनिक साद

  • Written By: Last Updated:

Jitendra Awhad On Ajit Pawar :  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपला महाराष्ट्र दौरा सुरू केला असून आज त्यांची येवला येथे सभा होणार आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या मतदारसंघात ही सभा पार पडणार आहे. छगन भुजबळ यांनी अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. शरद पवारांच्या या दौऱ्यावर जितेंद्र आव्हाड यांनी मोठे वक्तव्य केले आहे. आमच्यामुळे जर तुम्ही बाहेर गेला असाल तर मी राजकारण सोडून देतो पण तुम्ही परत या असे आवाहन त्यांनी अजित पवार गटाला केला आहे.

अजित पवार यांच्या गटाकडून जितेंद्र आव्हाडांवर जोरदार निशाणा साधण्यात येत आहे. आमचे भांडण विठ्ठलाशी नसून त्याच्या आजूबाजूच्या दोन-तीन भडव्यांशी आहे असे म्हणत जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला जात आहे.

क्रांतिकारी निर्णयाच्या दिशेनं नार्वेकरांचं पाऊल; शिंदे-ठाकरेंच्या 55 आमदारांची धाकधूक वाढली

यावर आव्हाड म्हणाले की, जर माझ्यामुळे तुम्ही गेला असाल तर परत या मी राजकारण सोडून देतो. मी दूर कुठे तरी निघून जाईल. मला सत्तेचं राजकारण करायचं नाही, मला पैशाचं राजकारण करायचं नाही, मला बँकेचे राजकारण करायचं नाही. तुम्ही परत या. मी माझ्यासोबत जयंत पाटलांनाही घेऊन जातो, असे आवाहन आव्हाडांनी अजित पवारांना केले आहे.

‘मी टायर्ड नाही, रिटायर्डही नाही’; दौरा सुरू होण्याआधीच पवारांनी अजितदादांना डिवचलं!

त्यांची जर भावना आहे की आम्ही खराब आहोत तर आम्ही निघून जातो. आम्हाला पद, प्रतिष्ठा मिळाली. महाराष्ट्राच्या इतिहासात आपलं नाव निघत आहे. याव्यतिरिक्त माणसाला आणखी काय हवं असतं. आम्ही निघून जातो, असे आव्हाड म्हणाले. शरद पवारांसाठी आम्ही हा त्याग करायला देखील तयार आहोत, असे आव्हाडांनी म्हटले आहे.

Tags

follow us