Download App

महिला आयोग अध्यक्षपदावरुन चाकणकरांचं निलंबन करा; राष्ट्रवादी शरद पवार गटाची मागणी

NCP Political Crisis :  राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आता पदाधिकाऱ्यांकडून आरोप- प्रत्यारोप होत आहेत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी महिलांच्या गोपनीय बाबी, आपला गौरव होण्यासाठी सार्वजनिक जीवनात आणल्या असल्याचा आरोप शरद पवार यांच्या गटाच्या प्रवक्त्या हेमा पिंपळे यांनी केल्या आहेत. चाकणकर यांना कोणताही अनुभव नसताना त्यांची या पदावर नेमणूक करण्यात आली. परंतु आता त्या शरद पवार यांच्यावर टीका करत आहेत. त्यामुळे त्यांना राज्य महिला आयोगाच्या पदावरून अपात्र का करू नये? असा सवाल देखील पिंपळे यांनी उपस्थित केला आहे.  (Rupali Chakankar vs Hema Pimpale )

पिंपळे म्हणाल्या की,  “रूपाली चाकणकर या माझ्या पूर्वाश्रमीच्या सहकारी आहेत. वास्तविक पाहता त्यांना कुठलेही कायद्याचं ज्ञान नसताना, कुठल्याही एनजीओचा महिलांच्या प्रश्नावर कामाचा अनुभव नसताना  पवार साहेबांनी कार्यकर्ती म्हणून त्यांना संधी दिली. वास्तविक पाहता आमच्याकडे अनेक सीनियर महिला आहेत. कायद्याचं ज्ञान असणाऱ्या महिलांच्या प्रश्नांची जाण आणि भान असणाऱ्या, समाजात रस्त्यावर उतरून काम करणाऱ्या अनेक आमच्याकडे सीनियर कार्यकर्त्या होत्या. परंतु त्यातूनही त्यांना संधी मिळाली. त्यांनी त्यांच्या संधीचं सोनं करावं एवढीच माझी त्यांना विनंती आहे.”

मोदींच्या प्रचारावरुन मिटकरींनी अजितदादांना पाडलं तोंडावर; म्हणाले, ते त्यांचं वैयक्तिक मत

त्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेत. एक ऑटोनॉमस स्वायत्त संस्था त्या चालवतात, असं असताना सुद्धा स्वतःला ग्लोरीफाय करण्यासाठी अनेक कॉन्फिडन्शिअल  ज्या गोष्टी महिलांच्या महाराष्ट्रातल्या असतात. त्या कॉन्फिडन्शिअल गोष्टी सुद्धा पब्लिक डोमेनमध्ये आणायचं काम त्या  वारंवार करतात. त्यामुळे मला वाटतं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदावरूनच त्यांचं निलंबन  का करण्यात येऊ नये? त्यांचं निलंबनच केलं पाहिजे, असे त्या म्हणाल्या.

महसूल खातं जाणार का? विखे पाटील म्हणाले, मला वाटतं…

त्यांनी परवा पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की, 15 महिन्यानंतर मी एका राजकीय व्यासपीठावर आले म्हणजे तुम्हाला राज्य महिला आयोग तुमच्या करिअरमध्ये महत्त्वाचा वाटत नाही, म्हणून तुम्ही त्यांचा दुरुपयोग करताय. तुम्ही राज्य महिला आयोगाची गरिमा सांभाळत नाही. तुम्हाला फक्त स्वतःला गोरीफाय करायचंय आणि राजकीय करिअर घडवण्यासाठी राज्य महिला आयोगाचा उपयोग करायचा असं तुमच्याच सांगण्यावरून दिसते, असे म्हणत त्यांनी चाकणकरांना सुनावले.

Tags

follow us

वेब स्टोरीज