महसूल खातं जाणार का? विखे पाटील म्हणाले, मला वाटतं…

महसूल खातं जाणार का? विखे पाटील म्हणाले, मला वाटतं…

Radhakrishna Vikhe on Maharashtra Cabinet Expansion : राष्ट्रवादीत बंड करून अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरू झाल्या असल्या तरी विस्तार अजूनही झालेला नाही. शिंदे गट आधीच नाराज आहे त्यात अजित पवारांचा गट दाखल झाल्याने कोणाला कोणते खाते द्यायचे, यासाठी मोठीच कसरत करावी लागत आहे. आपले खाते जाते की काय या विचाराने भाजपाच्या मंत्र्यांच्या पोटातही गोळा उठला आहे.

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचेही महसूल खाते जाणार की काय अशी चर्चा सुरू झाली आहे. या चर्चांवर आता खुद्द मंत्री विखे पाटील यांनीच उत्तर देत पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.

Maharashtra Politics : ‘उद्धव ठाकरेच मोठा कलंक’; विखे पाटलांचा घणाघात

विखे पाटील नगरमध्ये आले होते. यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना हाच प्रश्न विचारला. त्यावर विखे पाटील यांनी सूचक शब्दांत उत्तर देत भाजप श्रेष्ठींना इशाराही दिला. खाते वाटपाचा निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते घेत असतात. आणि ते करताना जरूर कामाचं मूल्यमापन करतील. याबद्दल मला काहीच शंका नाही, असे उत्तर विखे पाटील यांनी दिले.

काही झाले तरी अजित पवार यांना अर्थखाते देऊ नका, अशी मागणी शिंदे गटातून समोर येत आहे. तर दुसरीकडे काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या आणि येथे चांगला जम बसविलेल्या महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनाही दणका बसण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या घडामोडीत काही काळ मुख्यमंत्री होण्याच्या चर्चा असलेल्या विखे पाटलांचे (Radhakrishna Vikhe) महसूल खाते जाईल की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

लोकशाहीत मतदारच सर्व शक्तिमान, पश्चिम बंगालच्या निकालावर रोहित पवारांचं खोचक ट्विट…

तसे पाहिले तर विखे पाटील काँग्रेसमधून भाजपात आले. येथे आल्यानंतर त्यांनी आपला राजकीय करिष्मा दाखवत थोडक्याच काळात भाजपात चांगला जम बसविला. याआधीच्या भाजप सरकारच्या काळात त्यांच्याकडे गृहनिर्माण खात्याची जबाबदारी होती. त्यानंतर भाजप-शिंदे सरकारच्या काळात तर त्यांना थेट महसूलमंत्री पदाचीच लॉटरी लागली. महसूल खाते हे अतिशय वजनदार खाते मानले जाते. विखे यांच्या रुपाने हे खाते नगर जिल्ह्याला मिळाले. याआधी महाविकास आघाडी सरकारच्या काळात बाळासाहेब थोरात यांच्या रुपाने हे खाते नगर जिल्ह्याकडेच होते.

 

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube