लोकशाहीत मतदारच सर्व शक्तिमान, पश्चिम बंगालच्या निकालावर रोहित पवारांचं खोचक ट्विट…

लोकशाहीत मतदारच सर्व शक्तिमान, पश्चिम बंगालच्या निकालावर रोहित पवारांचं खोचक ट्विट…

सत्तेचा आणि यंत्रणांचा गैरवापर केला तरीही लोकशाहीत सर्वसामान्य मतदारच सर्व शक्तिमान असतो, असं खोचक ट्टिट करीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ममता बॅनर्जींच्या टीएमस पक्षाचा झेंडा फडकला आहे. त्यावर ट्विट करत मतदारांनी दंडेलशाहीला झुगारत ममतादीदींच्या पदरात 90 टक्के ग्रामपंचायती टाकल्याचं रोहित पवार म्हणाले आहेत.

देशात आणि राज्यात सत्तेचा गैरवापर करीत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातो. राज्यात भाजप सत्तेत आल्यानंतर विरोधी पक्षांच्या अनेक नेत्यांच्या मागे ईडीच्या धाडी टाकण्यात आल्याचं दिसून येतंय. यामध्ये विशेषत: शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांचा समावेश आहे. त्यावरुन राज्यात विरोधकांकडून कायमच सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडल्याचं पाहायला मिळालं आहे.

अखेर शिवतारेंनी अजितदादांशी जुळवून घेतलं! तोंडभरुन कौतुक करत म्हणाले, ते तर माझे आवडीचे नेते…

पवार ट्टिटमध्ये म्हणाले, “सत्तेचा आणि सरकारी यंत्रणांचा कुणी कितीही गैरवापर करुन राजकीय विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न केला तरी लोकशाहीत अखेर सर्वसामान्य मतदारच सर्वशक्तिमान असतो हे आज पुन्हा एकदा प. बंगालच्या ग्रामपंचायत निवडणुकीत सिद्ध झालं”.

“निवडणुकीत झालेला हिंसाचार पाहून वाईट वाटलं, पण या निवडणुकीत लोकांनी आपली ‘पॉवर’ दाखवून दिली. विधानसभा निवडणुकीप्रमाणेच आजही तेथील ९० टक्के ग्रामपंचायती ममता दिदींच्या पदरात टाकून जनतेने दंडेलशाहीला झुगारले आहे, समझने वाले को इशारा काफी है” असं पवार म्हणाले आहेत.

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने 18 हजार 590 ग्रामपंचायती जागांवर विजय मिळवला, तर भारतीय जनता पक्षाने 4 हजार 479 जागा जिंकल्या आहेत. तसेच सीपीआय (एम) आणि काँग्रेसने अनुक्रमे 1 हजार 426 आणि 1 हजार 071 जागा मिळवल्या आहेत, तर अपक्ष उमेदवारांनी 1 हजार 062 जागा जिंकल्या आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube