Sharad Pawar News : समरजित घाटगे यांना मोठ्या मताधिक्क्याने विधानसभेवर पाठवा, ते फक्त आमदाराच राहणार नाहीत तर त्यांच्यावर जबाबदारी देणार असल्याचा शब्दच खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिलायं. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून घाटगे कमळ ठेऊन तुतारी फुंकणार असल्याची चर्चा सुरु होती. अखेर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. कागलमध्ये घाटगे यांच्या प्रवेशादरम्यान आयोजित कार्यक्रमात शरद पवार बोलत होते.
शरद पवार पुढे बोलताना म्हणाले, समरजित घाटगे यांच्या भूमिकेचं मी स्वागतच करीत आहे, अनेक दिवसांपासून सुरु होतं, अखेर घाटगे यांनी आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादीत प्रवेश केलायं. आता तुम्ही सर्वांनी मिळून त्यांना विधानसभेवर पाठवा, ते फक्त आमदारच राहणार नाहीत तर त्यांच्यावर जबाबदारी देणार असल्याचा शब्दच शरद पवार यांनी कागलकरांना दिलायं.
दोन लाख कर्मचारी अन् दीड लाख पेन्शनर्स.. ना पगार ना पेन्शन; ‘या’ राज्यात पहिल्यांदाच घडलं…
तसेच देशात, राज्यात महिलांवर अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. बदलापूर घटनेवरुन हजारो लोकं रस्त्यावर आले. केंद्र सरकार अद्याप कोणतीही कठोर पाऊलं उचलत नाही. महिलांवर अत्याचारा झाला तर संताप व्यक्त केला जातो हा संताप व्यक्त करणं काही गुन्हा नाही, त्यांना मदत करण्याऐवजी त्यांना शिंदे सरकारकडून अटक केली जात असल्याची टीका शरद पवार यांनी केलीयं.
शेतीच्या पायाभूत सुविधांसाठी केंद्राचे धडाकेबाज निर्णय; 14 हजार कोटी मंजूर
शिवरायांच्या पुतळ्याच्या निर्मितीमध्ये भ्रष्टाचार
छत्रपती शिवरायांनी अनेक गडकिल्ले उभारले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे राजकोट किल्ला आहे. राजकोट किल्ल्यावर शिवरायांचा पुतळा एक वर्षांपूर्वी उभारण्यात आला आहे. पण आता हा पुतळा उध्वस्त झाला असून पडला आहे. या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगतात की, वाऱ्याचा वेग जास्त होता म्हणून हा पुतळा पडला, पण मुंबईच्या इंडिया गेट परिसरात साठ वर्षांपूर्वी शिवरायांचा पुतळा यशवंतराव चव्हाणांनी उभा केला . हा पुतळा आजही उभा आहे. जोऱ्याचा वारा असूनही कधी पुतळ्याला धक्का नाही. इथे एक वर्षापूर्वी उभारलेला पुतळा कोसळला. या पुतळ्याच्या निर्मितीमध्ये भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोपही शरद पवार यांनी यावेळी केलायं.