व्हिसासाठी बनाव, खोटे आधारकार्ड बनविले; सिंधुदुर्गातील जंगलात सापडलेल्या विदेशी महिलेची खरी स्टोरी उघडकीस

  • Written By: Published:
व्हिसासाठी बनाव, खोटे आधारकार्ड बनविले; सिंधुदुर्गातील जंगलात सापडलेल्या विदेशी महिलेची खरी स्टोरी उघडकीस

American Woman lalita kai is found chained to a tree: सिंधुदुर्गतील सावंतवाडीजवळील जंगलात साखळीने बांधलेली विदेशी महिला आढळून आली होती. जनावरे चारणाऱ्या व्यक्तीला या महिलेचा रडण्याचा आवाज आल्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने या महिलेची सुटका करण्यात आली. अमेरिकन महिला या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली होती. महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. महिलेजवळ बॅग, मोबाइल फोन, टॅबलेट आणि 31 हजार रुपये सापडले होते. त्यावरून महिलेला चोरीच्या उद्देशाने बांधलेले नसल्याचे पोलिस तपासात समोर आले. तिच्याकडे असलेले अमेरिकन पासपोर्ट आणि भारतीय कागदपत्रांवरून तिची ओळख पटली. ललिता कोई असे 50 वर्षांच्या महिलेचे नाव आहे. ‘दिव्य मराठी’ने यामागील स्टोरीचा उलगडा केलाय.

Haryana : ‘गो-तस्कर’ समजून गोळ्या झाडल्या अन् 12 वीच्या विद्यार्थ्याचा नाहक बळी गेला

चाळीस दिवस ही महिला अन्नपाण्याशिवाय जंगलात राहिलीय, असे सुरुवातीला सांगण्यात आले. परंतु आरोग्य विभागाने ही महिला अन्ना पाण्याविना इतके दिवस जगू शकत नाही, असे स्पष्ट केले. पोलिसांनी या महिलेची संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली. प्रथम या महिलेची सुटका करणारे ग्रामस्थ पांडुरंग भावजी गावकर यांच्याकडून संपूर्ण माहिती पोलिसांनी घेतली. त्यानंतर कागदपत्राच्या आधारे संपूर्ण प्रकरणापर्यंत पोलीस गेले. ही महिला अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स येथील आहे. तिने बोस्टन विद्यापीठातून मानसशास्त्राची पदवी घेतलेली असल्याची माहिती पोलिसांना अमेरिकन दूतावासातून मिळाली आहे.


‘हा’ संविधानाचा अपमान, नाना पटोलेंचा जातीनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून सरकारवर हल्लाबोल


तामिळनाडूत अनेक वर्षे राहिली

ही महिला दहा वर्षांपूर्वी तामिळनाडूतील तिरुवन्नमलाई येथे योग अभ्यासासाठी आली होती. सिंधुदुर्ग पोलिसांनी याबाबत तामिळनाडू पोलिसांकडे संपर्क साधून माहिती घेतली. सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक पथक हे तामिळनाडूतील तिरुवन्नमलाईला पाठविले होते. ही महिला भाड्याने घर घेऊन राहत होती. परंतु तिच्याकडे पैसे नसल्याने तिने हे घर सोडले असल्याचे घरमालकाने सांगितले. महिलेकडील व्हिसाची मुदत संपली होती. तिची आर्थिक परिस्थिती बेताची झाली होती. त्यामुळे अमेरिकेत परतण्यासाठी या महिलेने नाटक रचले होते हे उघड होत आहे.


स्वतःच साखळीने बांधून चाव्या फेकल्या

या महिलेकडील मोबाइल आणि टॅबची तपासणी केलीय. त्यात काहीही संशयास्पद आढळले नाहीत. बांधलेल्या अवस्थेत आढळलेल्या महिलेपासून जवळ कुलूपाच्या चाव्या होत्या. याचा अर्थ या महिने स्वतःला बांधून चाव्या फेकून दिल्या असाव्यात, असे पोलिस सांगत आहेत.

अनेकदा नाटक रचले, पण सावंतवाडीतील जंगलात आली कशी?

या महिलेने स्वतःला साखळदंडाने बांधून ठेवल्याची ही पहिलीच वेळ नाही. 2020 मध्ये या महिलेने तामिळनाडूमध्ये असा प्रयत्न केला होता. मात्र तिची लगेच सुटका झाली होती, असे पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी दिव्य मराठीशी बोलताना स्पष्ट केले आहे. परंतु ही महिला सावंतवाडीच्या जंगलात कशी आली आहे याबाबत सिंधुदुर्ग पोलिसांकडून उलगडा झालेला नाही. ते या प्रकरणी तपास करत आहेत.

महिला मानसिक रुग्ण

ही महिला मानसिक रुग्ण असल्याचे रत्नागिरी मानसिक रुग्णालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या महिलेने यापूर्वीही दिल्ली, मुंबई, गोवा येथे या महिलेने मानसिक आजारावर उपचार घेतलेले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube