पाठ्यपुस्तकात शिवरायांसाठी अर्ध पान राहणार नाही, छगन भुजबळांचा भाजपला टोला

सध्या देशभरात केंद्र सरकार नवं – नवीन निर्णय घेत आहे. आता काल परवा केंद्र सरकारने दहावीच्या अभ्यास क्रमातून लोकशाही वंघळण्याचा निर्णय घेतला. तसेच केंद्र सरकार वारंवार महाराष्ट्रातील युग पुरुषांचा अपमान करत आहे. सावित्री बाई फुले यांचा महाराष्ट्र सदन मधील पुतळा हटवला आता पुढे चालून शिवाजी महाराजयांच पुस्तकात अर्ध पान राहणार आहे. तर फुले आंबेडकर यांना […]

Bhujbal

Bhujbal

सध्या देशभरात केंद्र सरकार नवं – नवीन निर्णय घेत आहे. आता काल परवा केंद्र सरकारने दहावीच्या अभ्यास क्रमातून लोकशाही वंघळण्याचा निर्णय घेतला. तसेच केंद्र सरकार वारंवार महाराष्ट्रातील युग पुरुषांचा अपमान करत आहे. सावित्री बाई फुले यांचा महाराष्ट्र सदन मधील पुतळा हटवला आता पुढे चालून शिवाजी महाराजयांच पुस्तकात अर्ध पान राहणार आहे. तर फुले आंबेडकर यांना किती जागा मिळणार पुस्तकात हे पाहावं लागणार आहे. असा उपरोधिक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी भाजपला लगावला. ते आज नागपुरात पत्रकारांशी बोलत होते.

पुढे ओबीसीबाबत बोलताना भुजबळ म्हणतात.. मी शिवसेना सोडून आलो ते ओबीसीसाठी त्याकाळात शिवसेना सोडणं सोपं नव्हतं कारण तिथे आत जाण्याचा दरवाजा होता बाहेर येण्याचा नाही पण मी याच नागपुरातुन शिवसेना सोडली. शरद पवार ओबीसीचा विचार करत होते म्हणून मी त्यांच्या सोबत आलो.

ओबीसीचा अभ्यास करण्यासाठी सुमित्रा महाजन यांच्या अध्यक्षते खाली समिती निर्माण झाली होती त्यांनी डेटा तयार करावा लागेल सांगितलं पण झालं नाही. दुसरी कमिटी मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली झाली मात्र तेव्हाही झाली नाही. 2016 मध्ये जो डेटा आला तो मोदी साहेबांकडे गेला मात्र त्यांनी आकडा जाहीर केला नाही. फडणवीस यांनी एक ताबडतोड कायदा बनविला तो टिकला नाही मी आधीच सांगितलं होतं टिकणार नाही.

संजय राऊतांवर नाना पटोलेंची चुप्पी; न बोलण्यांच कारणही सांगून टाकलं

इंपेरिकल डेटा त्यांच्या लोकांनी एअर कंडिशन मध्ये बसून केला , ते म्हणाले मुंबई मध्ये ओबीसी नाही. घाईघाई ने एक अहवाल तयार केला मात्र तो अहवाल आम्हाला मान्य नाही. ओबीसी जनगणना झाली पाहिजे ही मागणी अनेक राज्यात झाली तीच मागणी आमची पण आहे ती पूर्ण झालीच पाहिजे. ज्या प्रमाणे एसी, एसटी ला निधी मिळतो त्याप्रमाणे ओबीसी ला मिळाला पाहिजे. असे यावेळी भुजबळ म्हणाले.

Exit mobile version