Jayant Patil Comment on Dhananjay Munde : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्याबद्दल मोठ वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याची राज्यात मोठी चर्चा सुरू झाली आहे. पंधरा वर्षांपूर्वी धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घेणं हा आमचा आत्मघातकी प्लॅन होता असं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलं आहे. (Dhananjay Munde ) आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छूक उमेदवारांसोब जयंत पाटलांनी बैठक घेतली. त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. त्या दरम्यान, त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
त्यांनी असं राजकारण केलं नाही
भाजप आणि आरएसएस धनंजय मुंडे यांना पाठवून अजित पवारांना भाजपमध्ये आणण्याचा प्लॅन होता का? या पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना जयंत पाटील म्हणाले, गोपीनाथ मुंडे यांनी सध्याचं भाजप राजकारण करतोय असं राजकारण कधी केलं नाही. तो आमचाच आत्मघातकी आमचा प्लॅन होता, अशी कबुली जयंत पाटील यांनी दिली. त्यामुळे पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्या तत्कालीन राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा होत आहे.
भारताला दोन पदकं जिंकण्याची संधी, दुसरा दिवस ठरणार ऐतिहासिक? वाचा, आजचं वेळापत्रक
मराठा आरक्षण संदर्भात जयंत पाटलांनी उत्तर देणं टाळलं. माझ्या संपर्कात अनेकजण आहेत, आज बाबाजानी यांचा प्रवेश झाला. सगळे पुढारी गेल्यावर आम्हाला वाटलं आमच्याकडे काय राहतंय? मात्र, जनता आमच्यासोबत आहे हे लक्षात आलंय. दरम्यान, बावनकुळे शरद पवारांवर केलेल्या टिकेवर बोलताना पाटील म्हणाले त्यांच्यासाठी अमित शाह हे सूर्य आहेत, त्यामुळं ते तसंच म्हणणार. तसंच, ते प्रदेशाध्यक्ष असल्यामुळं त्यांना बोलावं लागतंय, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
राज्याच्या तिजोरी पैसे
अर्थमंत्री अजित पवार यांनी केलेले ट्विट हे त्यांनी केले नाही, त्यांना करायला लावलं आहे. असं सांगत अजितदादांच्या ट्विटवर जयंत पाटलांनी डॉन चित्रपटाचं उदाहरण दिलं. डॉन चित्रपटात जेव्हा डॉन एका ठिकाणी अडकतो, तेव्हा तेथील नटी त्याला विचारते आता आपण बाहेर कसं जायचं, तेव्हा डॉन म्हणतो माझ्याकडे एक रिव्हॉल्व्हर आहे, तेव्हा नटी म्हणते त्यात गोळ्या नाहीत. तेव्हा डॉन म्हणतो यात गोळ्या नाहीत हे तुला आणि मलाचं माहीत आहे, त्यांना माहीत नाही, आणि बंदूक दाखवत डॉन पोलिसांसमोरुन निघून जातो. तसंच राज्याच्या तिजोरी किती पैसे आहेत, हे आता समोर आलंय, असा टोला जयंत पाटीलांनी यावेळी लगावला.