भारताला दोन पदकं जिंकण्याची संधी, दुसरा दिवस ठरणार ऐतिहासिक? वाचा, आजचं वेळापत्रक
Paris Olympic 2024 : पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा आता चांगाली रंगात आली आहे. सर्वच भारतीय खेळाडूंकडून जोरात सुरूवात झाली असून पदकांसाठीचे सामनेही सुरू झाले आहेत. दरम्यान, काल भारताची कामगिरी चांगली झाली. (Paris Olympic) सुरुवातीला नेमबाजांकडून काहीशी निराशा झाली असली, तरी मनू भाकरने पदकाचं स्वप्न दाखवलंय. तसंच इतर क्रीडा प्रकारात भारतीय खेळाडूंनी निराश केलेलं नाही.
सी. पी. राधाकृष्णन महाराष्ट्राचे नवे राज्यपाल; हरिभाऊ बागडेंकडे राजस्थानचा पदभार, वाचा सविस्तर यादी
आता दुसऱ्या दिवशीही अनेक क्रीडा प्रकारात भारतीय खेळाडू मैदानात उतरणार आहेत. दुसऱ्या दिवशी म्हणजे आज भारतीय खेळाडू नेमबाजी, बॅडमिंटन, रोइंग, टेबल टेनिस, जलतरण, तिरंदाजी, टेनिस आणि बॉक्सिंग अशा विविध क्रीडा प्रकारात खेळताना दिसणार आहेत. यामध्ये महत्वाचं म्हणजे आज भारताचं पदकांचं खातं उघडू शकतं. भारताची युवा नेमबाज मनू भाकरने १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात अंतिम फेरीत स्थान मिळवलं आहे. त्यामुळे आता पदकासाठी निशाणा साधताना दिसेल. तिची अंतिम फेरीत चांगली कामगिरी झाली, तर ती भारताला पदकांचं खातं उघडून देईल.
ऑलिम्पिकमधला पहिला क्रिकेट सामना; 124 वर्षांपूर्वी या देशाला मिळालं सुवर्णपदक
त्याचबरोबर महिला रिकर्व्ह सांघिक प्रकारात भारताच्या संघाने क्वार्टर-फायनलमध्ये स्थान मिळवलं आहे. त्यामुळे जर या फेरीत भारताने विजय मिळवला तर सेमीफायनलमध्ये स्थान मिळवता येईल, त्यामुळे पदकांच्या आशा आणखी उंचावतील. तसंच या प्रकारातील पदकांच्या लढती रविवारीच होणार आहेत. जर सेमीफायनलमध्ये भारतीय महिला संघ जिंकला, तर पदक तर निश्चित होईलच, पण भारतीय संघ सुवर्णपदकासाठी खेळेल. तसंच जर सेमीफायनलमध्ये पराभव झाला, तर भारतीय संघाला कांस्यपदकाचा सामना खेळावा लागेल.
आत्तापर्यंत तिरंदाजीत भारताला एकदाही ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकता आलेलं नाही, त्यामुळे भारतीय संघाचा प्रयत्न पदकासाठी असणार आहे. दरम्यान, याव्यतिरिक्त पीव्ही सिंधू, एचएस प्रणॉय, बलराज पनवार, मनिका बत्रा, शरथ कमल, सुमीत नागल असे अनेक खेळाडूही रविवारी सामने खेळणार आहेत. त्यामुळे त्यांच्या कामगिरीकडेही लक्ष असेल.
आजचं वेळापत्रक
नेमबाज
- १० मीटर एअर पिस्तुल फायनल (दुपारी ३.३० वाजता) (मनू भाकर) (मेडलसाठी लढत)
- महिला १० मीटर एअर रायफल क्लालिफायर (दुपारी १२.४५ वाजता) (इवानिल वलारिवन आणि रमिता जिंदाल)
- पुरुष १० मीटर एअर रायफल क्लालिफायर (दुपारी २.४५) (संदीप सिंग आणि अर्जुन बबुता)
बॅडमिंटन
- महिला एकेरी (दुपारी १२.५० वाजता) (पीव्ही सिंधू)
- पुरुष एकेरी (रात्री ८ वाजल्यापासून) (एचएस प्रणॉय)
रोइंग
- पुरुष एकेरी स्कल रेपेचेज (दुपारी १.०६ वाजता) (बलराज पनवार)
टेबल टेनिस
- महिला एकेरी राऊंड ऑफ ६४ (दुपारी २.१५ वाजता) (श्रीजा अकुला)
- महिला एकेरी राऊंड ऑफ ६४ (दुपारी ४.३० वाजता) (मनिका बत्रा)
- पुरुष एकेरी राऊंड ऑफ ६४ (दुपारी ३.०० वाजता) (शरथ कमल)
- पुरुष एकेरी राऊंड ऑफ ६४ (रात्री ११.३० वाजता) (हरमीत देसाई)
जलतरण
- १०० मीटर बॅकस्ट्रोक हिट्स (दुपारी ३.१३ वाजता) (श्रीहरी नटराज)
- २०० मीटर फ्रिस्टाईल हिट्स (दुपारी ३.३० वाजता) (धिनीधी देसिंघू)
- १०० मीटर बॅकस्ट्रोक सेमीफायनल [रात्री १.०२ वाजता (२९जुलै)] (श्रीहरी नटराज जर पात्र ठरला तर)
- २०० मीटर फ्रिस्टाईल सेमीफायनल [रात्री १.२० वाजता (२९जुलै)] (धिनीधी देसिंघू जर पात्र ठरली तर)
टेनिस
- पुरुष एकेरी पहिली फेरी (दुपारी ३.३० वाजल्यापासून) (सुमीत नागल)
- पुरुष दुहेरी पहिली फेरी (दुपारी ३.३० वाजल्यापासून) (रोहन बोपण्णा आणि एन श्रीराम बालाजी)
बॉक्सिंग
- महिला ५० किलो राऊंड ऑफ ३२ (दुपारी ३.५० वाजता) (निखत झरिन)
तिरंदाजी
- महिला रिकर्व्ह सांघिक क्वार्टर-फायनल (संध्या. ५.४५ वाजता) (अंकिता भकत, भजन कौर, दिपीका कुमारी)
- महिला रिकर्व्ह सांघिक सेमीफायनल (संध्या. ७.१७ वाजल्यापासून) (जर पात्र ठरले तर)
- महिला रिकर्व्ह सांघिक कांस्यपदकासाठी लढत (जर सेमीफायनल हरले तर) (रात्री ८.१८ वाजता)
- महिला रिकर्व्ह सांघिक सुवर्णपदाकासाठी लढत (जर सेमीफायनल जिंकली तर) (रात्री ८.४१ वाजता)