Ncp Sharadchandra Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला (Ncp Sharadchandra Pawar) निवडणूक आयोगाकडून नावानंतर आता चिन्ह बहाल करण्यात आलं आहे. अशातच लोकसभा निवडणुकाही काही दिवसांवरच येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचीही लोकसभा निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यावर आली. निवडणूक आयोगाकडून चिन्ह तुतारी मिळाल्यानंतर आता उद्या शनिवारी रायगडावरुन लोकसभा निवडणूकीचं नारळ फोडणार असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांकडून देण्यात आलीयं. यावेळी तुतारीचा नाद वाजवून शरद पवार गट नारळ फोडणार आहे.
बॉक्स ऑफिसवर ‘Article 370’ आणि ‘क्रॅक: जीतेगा तो जीगा’मध्ये टक्कर, कोण ठरेल अव्वल?
काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले होते. एक अजित पवार आणि दुसरा शरद पवार गट. अजित पवार गटाने सत्तेत सामिल होण्याच निर्णय घेतला. त्यानंतर पक्ष आणि चिन्हावरही दावा ठोकला होता. अखेर निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह घड्याळ अजित पवार गटाचचं असल्याचा निर्णय दिला. त्यापाठोपाठ विधी मंडळाकडूनही अपात्र आमदारांप्रकरणी राष्ट्रवादी अजित पवार यांचीच असल्याचा निकाल दिला आहे.
‘जयंत पाटील शेवटचा डाव आखणार..,’;’दिल्लीसुद्धा पवारांना घाबरते’ म्हणणाऱ्यांना विखेंचा मार्मिक टोला
अशातच निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला पक्षासाठी तीन नावे आणि चिन्ह सुचवण्याबाबत सूचना केल्या होत्या. त्यानंतर शरद पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार हे नाव देण्यात आलं. मात्र, चिन्हावर अद्याप निर्णय झाला नव्हता. अखेर काल रात्रीपर्यंत निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला तुतारी चिन्ह बहाल केलं आहे. शरद पवार गटाकडून कपबशी, शिट्टी, वडाचं झाड, अशा चिन्हांची मागणी करण्यात आली होती.
बैलगाडा मालक पंढरीशेठ फडकेंचे निधन : गणपत गायकवाडांआधी राहुल पाटलांवर केला होता गोळीबार
दरम्यान, तुतारी वाजवणारा माणूस चिन्ह मिळाल्यानंतर शरद पवार यांच्या पक्षाकडून रायगडावर या चिन्हाचं लॉन्चिंग करत लोकसभा निवडणुकांसाठी रणशिंग फुंकण्यात येणार आहे. शनिवारी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह सर्व वरिष्ठ नेते रायगडावर उपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.