“शरद पवार म्हणतील तसं…” : रोहित पवारांपाठोपाठ आणखी एक पुतण्या अजितदादांविरोधात मैदानात

“शरद पवार म्हणतील तसं…” : रोहित पवारांपाठोपाठ आणखी एक पुतण्या अजितदादांविरोधात मैदानात

Yugendra Pawar Visits NCP Sharad Pawar Party Office : “मी पवार साहेबांचा खूप आदर करतो. मी खूप लहान आहे त्यामुळे त्यांच्याबद्दल काही बोलू शकत नाही. पण ते माझ्याबद्दल बोलले हे ऐकून मला खूप चांगलं वाटलं. माझ्यात ऊर्जा आली. आता साहेब (शरद पवार) म्हणतील तसं”, हे शब्द आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शरद पवारांंशी (Sharad Pawar) फारकत घेणाऱ्या अजित पवार यांच्या सख्ख्या पुतण्याचे. निमित्तही खास होते. युगेंद्र पवार (Yugendra Pawar) आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयात आले होते. येथे त्यांनी कार्यालयाला भेट दिली. यानंतर पत्रकारांशी संवाद साधला.

शरद पवार यांनी युगेंद्र पवार राजकारणात आले तर त्यांचं स्वागतच असेल असे म्हणाल्याचे पत्रकारांनी त्यांना विचारले. यावर युगेंद्र पवार यांनी आपण राजकारणात येण्यास तयार असल्याचेच संकेत दिले. पवार म्हणाले, येथे आमचे मित्र आणि जुने सहकारी आहेत. आम्ही आधीपासूनच सामाजिक काम करत आहोत. येथील सहकारी आमच्याबरोबरही काम करत असतात. त्यांच्या विनंतीवरून मी आज येथे आलो.

शरद पवारांच्या आणखी एका नातवाची होणार राजकारणात एंट्री? कोण आहेत युगेंद्र पवार?

मी आधी मुंबईत होतो. नंतर पुण्यातही होतो. नंतर अमेरिका आणि युरोपात गेलो. त्यामुळे जवळपास सात ते आठ वर्षे देशाबाहेरच होतो. कुणाला वाटलं नव्हतं की मी देशात परत येईल. मी परत आल्यानंतर सुरुवातीला मुंबईत व्यवसाय पहायला लागलो. त्यानंतर चार वर्षांपूर्वी साहेबांनी विद्या प्रतिष्ठान येथे माझी निवड केली. दर आठवड्याला आमची बैठक असते. या बैठकीसाठी मी येथे येत असतो.

खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या की युगेंद्र पवार यांनी लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात माझा प्रचार केला तर मला आनंद होईल, असे विचारले असता युगेंद्र पवार म्हणाले मलाही आनंद होईल. आता लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत अशा परिस्थितीत मतदारसंघात दौरे करणार का? असे विचारले असता जर साहेबांनी सांगितलं तर नक्कीच करील.

राजकारणात आला तर आधी काय होण्यास आवडेल असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. मला खालून वर जायला आवडेल. तुम्हाला माहिती आहे की मी किती ग्राउंड लेव्हलला जाऊन काम करतो. राजकारणात नसतानाही मी सगळ्यांच्या भेटीगाठी घेत असतो. जर मला उद्या वर जायचं असेल तर ग्राउंड लेव्हलचा अनुभव खूप महत्वाचा ठरतो अशा सूचक शब्दांत त्यांनी आगामी राजकारणाचे संकेत दिले.

Yugendra Pawar : पवारांनी फोडलं अजितदादांच घर?; युगेंद्र पवार पहिल्यांदाच राजकीय फ्रेममध्ये

कोण आहेत युगेंद्र पवार ?
युगेंद्र पवार हे अजित पवार यांचे थोरले बंधू श्रीनिवास पवार यांचे पुत्र आहेत. युगेंद्र यांच्या मातोश्री शर्मिला पवार या गेल्या अनेक वर्षापासून शरयू फाउंडेशनच्या माध्यमातून बारामती व इंदापूर तालुक्यात कार्यरत आहेत. युगेंद्र पवार हे राजकीयदृष्ट्या सक्रीय नसले तरीही बारामती शहरात ते विविध उपक्रमांच्या माध्यमातून काम करत असतात. शरद पवार हे देखील युगेंद्र यांच्या विविध उपक्रमांना भेट देत असतात. त्यामुळे युगेंद्र पवार राजकारणात सक्रिय होण्याची शक्यता आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज