शरद पवारांच्या आणखी एका नातवाची होणार राजकारणात एंट्री? कोण आहेत युगेंद्र पवार?

  • Written By: Published:
शरद पवारांच्या आणखी एका नातवाची होणार राजकारणात एंट्री? कोण आहेत युगेंद्र पवार?

Yugendra Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) अजित पवारांच्या (Ajit Pawar) बंडखोरीमुळं दोन गट पडले. अनेक विश्वासू नेत्यांनी पवारांची साथ सोडली. मात्र, पवारांचे नातू आमदार रोहित पवार यांनी शरद पवारांसोबतच राहण्याची भूमिका घेतली आहे. दरम्यान, आता शरद पवार (Sharad Pawar) यांचा आणखी एक नातू राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे पुत्र युगेंद्र पवार (Yugendra Pawar) राजकारणात पदार्पण करण्याची तयारी करत असल्याची असल्याची चर्चा सुरू झाली.

सलग सुट्ट्या! भाविकांच्या गर्दीनं शिर्डी साईनगरी फुलली… 

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बारामतीत युगेंद्र पवार यांनी कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले आहे. यावेळी लावण्यात आलेल्या बॅनरवर शरद पवार आणि युगेंद्र पवार यांची फोटो झळकत आहेत. त्यामुळं युगेंद्र पवार राजकारणात पदार्पण करणार असल्याचा तर्क लावला जात आहे. दरम्यान, आज माध्यमाशी बोलतांना युगेंद्र यांना रोहित पवारांनी शरद पवारांसोबत राहण्याची भूमिका घेतली. तुमची भूमिका काय? यावर बोलतांना युगेंद्र म्हणाले, मी राजकारणात सक्रीय नाही. त्यामुळं मी भूमिका घ्यायचं काहीच कारण नही. दोघेही माझ्या जवळेच आहेत, असं युगेंद्र म्हणाले.

Manoj Jarange : येवल्याचं येडपट, बुजगावणं; बीडमध्ये जरांगेनी हल्लाबोल करत भुजबळांना दिल्या अनेक उपमा 

राजकारणात येणार का, यावर बोलतांना त्यांनी सांगितलं की, सध्या मी तेवढा विचार केला नाही. आज माझ्यावर अन्यच जबाबदाऱ्या अनेक आहेत. मात्र, लोकांनी विश्वास दाखवला तर विचार करेल, असं युगेद्र म्हणाले.

दरम्यान,युगेंद्र हे उत्तम संघटक आहेत. ते शरयू अॅग्रोचे सीईओ आहेत. बारामती येथील विद्या प्रतिष्ठानचे ते कोषाध्यक्ष आहेत. ते बारामती तालुका कुस्तीगीर युनियनचे अध्यक्षही आहेत. ते नेहमीच शरद पवार यांच्यासोबत दिसले. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर युगेंद्र सिल्व्हर ओकमध्ये शरद पवारांना भेटायला गेले होते. ते सतत शरद पवारांसोबत दिसत असल्याने त्यांचा राजकारणात प्रवेश होणार असल्याची चर्चा आहे. मात्र युगेंद्र राजकारणाची सुरुवात कुठून करणार हे स्पष्ट झालेले नाही. युगेंद्र राजकारणात आल्यास मोठी जबाबदारी मिळेल, असेही बोलले जात आहे. त्यामुळे युगेंद्र राजकारणात कधी प्रवेश करणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

दरम्यान, युगेंद्र हे नेहमीच शरद पवार यांच्यासोबत दिसले. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर युगेंद्र सिल्व्हर ओकवर पवारांना भेटायला गेले होते. ते सातत्याने शरद पवार यांच्यासोबत दिसत आहेत. त्यामुळं ते राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. मात्र युगेंद्र राजकारणाची सुरुवात कुठून करणार हे स्पष्ट झालेले नाही. युगेंद्र राजकारणात आल्यास मोठी जबाबदारी मिळेल, असेही बोलले जात आहे. त्यामुळे युगेंद्र राजकारणात कधी प्रवेश करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube