सलग सुट्ट्या! भाविकांच्या गर्दीनं शिर्डी साईनगरी फुलली…
Ahmednagar : सलग सुट्ट्या आल्याने शिर्डी (Shirdi)साईनगरी फुलल्याचे पाहायला मिळत आहे. त्यात चौथा शनिवार आणि रविवार तसेच सोमवारी नाताळ (christmas)अशा एकूण तीन दिवस सलग सुट्ट्या आल्या आहेत. सलग आलेल्या या सुट्ट्यांमुळे अनेकांनी बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन केला. यामुळेच सध्या शिर्डीमध्ये भाविकांची मोठी गर्दी होऊ लागली आहे.
Manoj Jarange : येवल्याचं येडपट, बुजगावणं; बीडमध्ये जरांगेनी हल्लाबोल करत भुजबळांना दिल्या अनेक उपमा
सलग सुट्ट्या आल्याने अनेकांकडून बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन तयार केला जातो. सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी व साईंचे दर्शन घेण्यासाठी शनिवारी सकाळपासूनच शिर्डीमध्ये भाविकांची मोठी मांदियाळी पाहायला मिळाली. तसेच पुढील दोन दिवस साईभक्तांनी शिर्डी गजबजली जाणार असे चित्र सध्या शिर्डीमध्ये दिसून येत आहे. दरम्यान भाविकांची होणार गर्दी पाहता प्रशासनाकडून योग्य ते नियोजन करण्यात आले आहे.
Lok Sabha Election : ‘आदेश मिळाला तर निवडणूक लढणारच’; दानवेंनीही ठोकला शड्डू !
ख्रिसमसच्या सलग सुट्ट्यांमुळे सध्या शिर्डीत साईंच्या दर्शनासाठी लाखो भाविक दाखल होत आहेत. या भाविकांच्या स्वागतासाठी मंदिर प्रशासनही सज्ज झालं आहे. जोडून आलेल्या सलग सुट्यांची पर्वणी साधत भाविकांनी शिर्डीत साईदर्शनासाठी गर्दी केली़.
आज 23 डिसेंबरला चौथा शनिवार, उद्या 24 डिसेंबरला रविवार आणि 25 डिसेंबरला नाताळ अशा या सलग सुट्यांमुळे भाविक शिर्डीमध्ये दाखल झाले आहेत. शनिवारपासून मोठ्या संख्येने भाविक हे शिर्डीमध्ये दाखल होत असून साईदर्शनाचा लाभ घेत आहे.
शनिवार रविवारच्या सलग सुट्ट्या व सोमवारी असलेला नाताळ या सुटली सलग लागून आल्याने भाविकांची मोठी गर्दी शिर्डीत झालेली पहायला मिळत आहे. भक्तांच्या गर्दीने साई मंदिराकडे जाणारे सर्व रस्ते फुलून गेले आहेत. साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी भविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहे. तसेच भक्तांना साई दर्शनासाठी किमान एक ते दोन तास रांगेत उभे राहवा लागत आहेत.
प्रशासनाचे भाविकांना आवाहान
सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे शिर्डीमध्ये पुढील दोन दिवस भाविकांची मोठी गर्दी असणार आहे. दरम्यान गर्दीत भाविकांनी साईंच्या दर्शनासाठी जातांना एकोप्याने जावे. आपल्या स्वताबरोबरच आपण आपल्या कुटुंबातील सदस्यांची देखील योग्य ती काळजी घ्यावी. तसेच काही अनुचित प्रकार आढळून आल्यास साईसंस्थानच्या सुरक्षा कर्मचारी तसेच प्रशासनास कळवावे, असे आवाहन प्रशासनाकडून भाविकांना करण्यात आले आहे.