Manoj Jarange : येवल्याचं येडपट, बुजगावणं; बीडमध्ये जरांगेनी हल्लाबोल करत भुजबळांना दिल्या अनेक उपमा

Manoj Jarange : येवल्याचं येडपट, बुजगावणं; बीडमध्ये जरांगेनी हल्लाबोल करत भुजबळांना दिल्या अनेक उपमा

Manoj Jarange : जर मराठ्यांना काही करायचं असतं तर आज केलं असतं. आज मराठ्यांनी शांतता रॅली (Peace rally)काढली. मराठ्यांना महाराष्ट्रात (Maharashtra)शांतता हवी आहे. मराठा समाजानं राज्याला शांततेचा संदेश देण्यासाठी लाखोंच्या संख्येनं शांतता रॅली काढली. यांचच यांनी सुरु केलं आहे. ते येवल्याचं येडपट साऱ्या दुनियाचं आलं आणि त्यांनीच त्यांच्या पाहुण्याचं हॉटेल जाळलं. आणि नावं आमच्या पोरांची घेतंय असं म्हणत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange)यांनी मंत्री छगन भुजबळ(chhagan bhujabal) यांच्यावर गंभीर आरोप केला.

Ole Aale Movie: नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांचा अनोखा कानमंत्र

मराठ्यांना हवंय आता त्यांच्या लेकरांचं आरक्षण म्हणजे मराठा आरक्षण. मराठा बांधवांनो आपल्याला डाग लावला गेला आहे. ज्यांना दिसत नसेल त्यांनी फक्त बघाच की मराठे आरक्षण कसे आणतात. मराठे आरक्षण कसे आणतात? तेच आता पाहा.

मोठी बातमी : मराठा आरक्षणासंदर्भात मोठा दिलासा; SC नं क्युरेटिव्ह याचिका स्वीकारली

शांतताप्रिय असणाऱ्या मराठा समाजाला डाग लावण्यात आला आहे. कोणी म्हणतं आमचं घर जाळलं, कोणी म्हणतं आमचं हॉटेल जाळलं. आमच्यावर म्हणजेच मराठ्यांवर खोटा डाग लावलाय असा हल्लाबोल मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला.

त्यांनीच त्यांचे हॉटेल जाळले आणि निष्पाप गोरगरिब मराठा बांधव त्याच्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला, पण घाबरणार तो मराठा कसला? आणि त्यातल्या त्यात बीड जिल्ह्यातला? असा सवालही यावेळी जरांगे पाटील यांनी केला.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सरकारला दिलेली मुदत उद्या (दि.24) संपत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज बीडमध्ये निर्णायक सभा होत आहे. या सभेला लाखो मराठा बांधवांनी अफाट गर्दी पाहायला मिळाली.

छगन भुजबळ साऱ्या दुनियाचं येडपड आहे, आणि सरकार त्याचच ऐकत आहे. ते सध्या बाजाराची पिशवी घेऊन हिंडत आहे. त्याच्यात कागदं घेऊन, बघा बघा मला कशा शिव्या देतात. मग कशाला बोलतो मग कशाला मराठ्यांच्या वाटेला जातो, असं सवाल जरांगे पाटील यांनी छगन भुजबळांना केला.

आत्ताशी मराठ्यांनी पिशव्या घेतल्यात, काही दिवसांनी तुटलेल्या चपला, केळाच्या साली घेऊन येणार असेही यावेळी जरांगे पाटील म्हणाले. तू थांब थोडं तुला म्हटलं होतं नादी लागू नकू, मी लई नमुना बेकार आहे. तुला आत्ताच खाल्लेलं पचेना मग तुझं पुढं काय होणार? आत्ता कसे छगन भुजबळ बारीक आवाजात बोलतात, जरांगेसाहेब म्हणतात आत्ता. पहिल्यांदाच नीट राहिलं असतं तर नसतं जमलं का? असेही जरांगे पाटील म्हणाले.

मनोज जरांगे म्हणाले की, कोणी त्यांना मंत्री केलं माहित नाही. आरक्षण मिळेपर्यंत गप्प बसा, आरक्षण मिळालं की छगन भुजबळ यांना कचकाच दाखवून देऊ असंही म्हणाले. त्यांची खूप दिवसांपासूनची फडफड सुरु आहे. आम्ही गप्प बसलो की काड्या करत आहेत, असेही ते म्हणाले. मराठा आरक्षणाच्या मध्ये कोणी आलं तर त्याला सुट्टी देणार नाही, असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube